बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने नवीन वर्षाच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. आपल्या कुटुंबीयांसह तिनं गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
25
आपला आगामी सिनेमा 'पंचक' या मराठी चित्रपटाला यश मिळावे, यासाठी माधुरीने श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीराम नेने (shriram nene) यांचा 'पंचक' सिनेमा 5 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
पंचक सिनेमाचा ट्रेलर VIDEO
35
माधुरी दीक्षितसोबत तिचे पती श्रीराम नेने आणि दोन्ही मुलांनीही बाप्पाचे दर्शन घेतले. नेहमीप्रमाणे यावेळेसही माधुरीने सुंदर पारंपरिक लुक कॅरी केला होता.
45
श्रीराम नेने आणि त्यांच्या मुलांनीही पारंपरिक पोशाख परिधान केला होता. कुटुंबीयांसह माधुरीने बाप्पाचे आशीर्वाद घेतले.