Dolly-Amandeep Sohi Death : बहिणीनंतर डॉली सोहीचे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन, मृत्यूनंतर अभिनेत्रीही इंस्टाग्रामवरील अखेरची पोस्ट व्हायरल

गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करणारी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री डॉली सोहीचे आज (8 मार्च) निधन झाले आहे. तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच बहीण अपनदीपने या जगाचा निरोप घेतला होता.

Dolly-Amandeep Sohi Death : टेलिव्हिजन क्षेत्रातून आज सकाळी अत्यंत दु:खाची बातमी आली ज्यामुळे संपूर्ण इंस्ट्रीला धक्का बसला आहे. खरंतर, अभिनेत्री असलेल्या बहीणी अमनदीप सोही आणि डॉली सोही यांचे निधन झाले आहे. अमनदीपच्या मृत्यनंतर काही तासांनी डॉलीने देखील या जगाचा निरोप घेतला. कावीळ आजाराने (Jaundice) ग्रस्त असलेल्या अमनदीपचे गुरुवारी (7 मार्च) रात्री निधन झाले. याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरने (Cervical Cancer)  त्रस्त असलेल्या डॉलीचे शुक्रवारी (8 मार्च) पहाटे निधन झाले.

डॉलीचा भाऊ मन्नू याने मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, डॉलीला सहा महिन्यांआधीच कळले होते तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत डॉलीवर उपचार सुरू होते.

अशातच आता अभिनेत्री डॉली सोहीची सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये डॉलीने म्हटले होते, “प्रार्थना- जगातील सर्वाधिक मोठे व्हायरलेस कनेक्शन असून एखाद्या चमत्कारासारखे काम करते. यामुळे प्लीझ मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.”

अमनदीपने रुग्णालयातील शेअर केली होती पोस्ट
दुसऱ्या बाजूला, अपनदीपने तिच्या इंस्टाग्रामवर अखेरची पोस्ट 22 फेब्रुवारीला शेअर केली होती. यामध्ये अमनदीप रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अमनदीप आणि डॉली या दोघींना मुंबईतील एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमनदीपला झालेल्या कावीळवर उपचार सुरू होते. तर डॉलीची केमोथेरपी सुरू होती.

डॉलीने या मालिकांमध्ये केलेय काम
अमृतसर येथे जन्मलेल्या डॉलीने 'मेरी आशिकी तुम से ही' आणि 'खूब लडी मर्दानी...झांसी की रानी' सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. अखेरचे डॉलीला 'झनक' मालिकेत पाहिले गेले. कॅन्सरबद्दल कळल्यानंतर डॉलीने शो सोडला होता.

आणखी वाचा : 

Naach G Ghuma Teaser : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि...., मराठीतील आगामी सिनेमा 'नाच गं घुमा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

भारतातील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यकलाकारावर अमेरिकेत गोळीबार, झाला मृत्यू

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला पॉप सिंगर रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स, जिंकली भारतीयांची मनं (Watch Video)

Share this article