GOAT Twitter Review : ब्लॉकबस्टर सिनेमा, थलापतिच्या चाहत्यांकडून भरभरून कौतुक

साउथ स्टार थलापति विजयचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'  चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. काहींनी तर चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले आहे.

Chanda Mandavkar | Published : Sep 5, 2024 4:03 AM IST / Updated: Sep 05 2024, 10:24 AM IST

GOAT Twitter Review : साउथ स्टार थलापति विजयचा सिनेमा ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सिनेमा जगभरात प्रदर्शित करण्यात आला. वेंकट प्रभू यांनी दिग्दर्शित केलेल्याचा पहिला रिव्हू सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. सोशल मीडियावरील युजर्सने गॉट सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय ट्रेड अ‍ॅनालिस्ट यांनी म्हटले की, सिनेमाची अ‍ॅडवान्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई होऊ शकते. सिनेमा 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्य तयार करण्यात आला आहे.

 

 

 

4 हजार स्क्रिनवर रिलीज सिनेमा
थलापति विजयचा बहुप्रतिक्षित सिनेमा GOAT जगभरातील 4 हजारांपेक्षा अधिक स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय युजर्सकडून सिनेमाचे कौतुक करण्यासह वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले आहे. सिनेमा तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज करण्यात आला आहे. याचे हिंदी भाषेतील वर्जनही प्रेक्षकांसाठी आणले जाणार आहे.

 

 

 

थलापतिच्या सिनेमाचा ट्विटर रिव्हू
थलापति विजयचा GOAT सिनेमा पाहिल्यानंतर युजर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने म्हटले की, फर्स्ट हाफ धमाकेदार आहे. दुसऱ्याने म्हटले की, विजयने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. तिसऱ्याने म्हटले, भावूक सीनने सिनेमा सुरु झाला पण ट्विस्टने प्रेक्षकांनी मनं जिंकली. याशिवाय सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर #TheGreatestOfAllTime आणि #GOAT असे हॅशटॅग वापरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.

 

 

 

ओटीटीवरही होणार रिलीज
थलापति विजयचा द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सिनेमाचे ओटीटी स्ट्रिमिंग अधिकार नेटफ्लिक्सने घेतले आहेत. सिनेमाचे तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेतील अधिकार 125 कोटी तर हिंदी भाषेतील अधिकार 25 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. याचे सॅटेलाइट अधिकार झी तमिळद्वारे 93 कोटींना खरेदी करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

कधीकाळी कचरा डब्यातील अन्नपदार्थ खायची, आज एका एपिसोडसाठी वसूल करते लाखो रुपये

Teachers Day 2024 : शिक्षणावर आधारित मराठीतील 5 सिनेमे, लावतील आयुष्याला कलाटणी

Share this article