Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांतचे 4747 क्रमांकाशी होते खास कनेक्शन, काय आहे किस्सा जाणून घ्या

बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला चार वर्षे उलटली आहेत. 14 जूनलाच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या चाहत्यांच्या मनात आजही त्याच्यासाठी दु:ख, प्रेम कायम आहे. जाणून घेऊया सुशांतच्या आयुष्यातील खास किस्से…

Sushant Singh Rajput's Death Anniversary : 12 वर्ष टेलिव्हिजन आणि 7 वर्षे बॉलिवूडमधील करियरमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्या मेहनतीच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचला होता. पटना येथे जन्मलेला सुशांत इंजिनिअर व्हायचे म्हणून घरातून निघाला खरा पण त्याच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते. आज सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त अभिनेत्याच्या आयुष्यातील खास किस्स्यांबद्दल जाणून घेऊया....

सुशांतचे शिक्षण
21 जानेवारी 1986 रोजी पटना येथे जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतने सुरुवातीचे शिक्षण पटनात घेतल्यानंतर दिल्लीत आला. दिल्लीत येऊन सुशांतला इंजिनिअर व्हायचे होते. पण नाटक क्षेत्राशी जोडला गेल्यानंतर सुशांतमधील अभिनयाची आवड अधिक वाढली गेली. खास गोष्ट अशी की, सुशांत इंजिनिअरिंगच्या परिक्षेत उत्तीर्ण झाला होताच. शिवाय ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रेंस परिक्षेत सुशांतला 7वा रँक मिळाला होता.

सुशांतने दिल्ली स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले होते. तीन वर्षांपर्यंत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर कॉलेज सोडले. अभ्यासात सुशांत फार हुशार होता. पण अभिनयाने त्याला वेड लावले होते. यासाठीच सुशांतने मध्येच शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.

सिनेमात बॅकग्राउंड डांन्सर
सुशांत सिंह राजपूत अभिनयासह डान्समध्येही उत्तम होता. शामक डावर आणि एश्ले लोबो यांच्याकडून डान्सचे धडे घेतल्यानंतर नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुप आणि बॅरी जॉन यांच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. सुशांत सिंह राजपूतने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा 'धूम-2' सिनेमात बॅकग्राउंड डान्सरमधून काम केले होते.

सुशांतची चंद्रावरील प्रॉपर्टी
वर्ष 2018 म्ये इंटरनॅशनल लूनर लँड्स यांच्याकडून सुशांतने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. दोन्ही हातांनी लिहिता येणाऱ्या सुशांतकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असाा टेलिस्कोपही होता. याशिवाय अभिनेत्याने नासा येथे जाऊन आंतराळवीर होण्याची तयारीही केली होता.

4747 क्रमांकाशी खास कनेक्शन
सुशांत सिंह राजपुतला सुपरबाइकची आणि कारची फार आवड होती. सुशांतकडील कलेक्शनमध्ये BMW K1300R, मासेराटी क्वाट्रोपोर्ट आणि एक रेंज रोव्हर कार होती. 4747 च्या खास कनेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास सुशांतच्या दोन्ही वाहनांचे नंबर प्लेटचे अखेरचे क्रमांक 4747 होती. असे सांगितले जाते की, एका ज्योतिषाच्या सांगण्यावरुन सुशांतने खास नंबर प्लेट लावली होती.

टेलिव्हिजनपासून करियरची सुरुवात
सुशांत सिंह राजपुतने वर्ष 2008 मध्ये टेलिव्हिनजवरील मालिका 'किस देश में है मेरा' पासून अभिनयाला सुरुवात केली होती. मालिकेत भले सुशांतला सेकेंड लीड रोल मिळाला होता. पण सुशांतच्या भूमिकेने प्रेक्षकांवर छाप पाडली. यानंतर एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता' मधून सुशांत सिंह राजपुतला रातोरात स्टारडम मिळाले.

सुशांतला नेहमीच बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. यासाठीच टेलिव्हिजवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय सुशांतने घेतला. सुशांतला बॉलिवूडमधील पहिला सिनेमा 'काय पो छे' होता. यानंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये 'एमएस धोनी', 'केदारनाथ' आणि 'छिछोरे' सारख्या सिनेमात काम केलेय.

आणखी वाचा : 

किरण आणि अनुपम यांची लव्ह स्टोरी आहे खास, वाचा कधी न ऐकलेला किस्सा

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनसह या कलाकारांनी वसूल केलीय एवढी Fees

Share this article