श्रद्धा कपूरला Stree-2 नव्हे रणबीरसोबतच्या सिनेमासाठी मिळालीय सर्वाधिक फी

Published : Aug 14, 2024, 11:12 AM ISTUpdated : Aug 14, 2024, 11:15 AM IST
Stree 2 Trailer

सार

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा स्री-2 मुळे सर्वाधिक चर्चेत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहितेय का, श्रद्धा कपूरला स्री-2 सिनेमाआधी एका सिनेमासाठी सर्वाधिक फी मिळालीय. याबद्दल जाणून घेऊया.

Shraddha Kapoor Stree-2 : श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असण्यासह तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. अशातच अभिनेत्रीचा आगामी सिनेमा ‘स्री-2’ येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होण्यास तयार आहे. पण सिनेमा प्रेक्षकांना 14 ऑगस्ट रात्रीपासूनच पाहता येणार आहे. या सिनेमासाठी श्रद्धा कपूरला 5 कोटी रुपयांची फी मिळाल्याचे सांगितले जात आहे. पण याआधी एका सिनेमाला श्रद्धा कपूरला सर्वाधिक फी मिळाली आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमासाठी श्रद्धाला मिळालेली फी
तू झूठी मैं मक्कार’ सिनेमा वर्ष 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकला होता. सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमासाठी श्रद्धा कपूरने 7 कोटी रुपयांची फी वसूल केली होती. रणबीर कपूरसोबतची श्रद्धाची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सिनेमात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूरही झळकले आहेत. या सिनेमाच स्टोरी मिक्की आणि टिन्नी या दोन पात्रांवर आधारित आहे.

सर्वाधिक फी वसूल करणारी अभिनेत्री
श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वाधिक फी वसूल करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाने ‘बागी-3’, ‘आशिकी-2’, ‘स्री’ सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय चाहते तिच्यावर अशा कारणास्तव प्रेम करतात की, ती नेहमीच त्यांच्यासोबत जोडलेली असते. इंस्टाग्रामच्या प्रत्येक स्टोरीवर श्रद्धा एक मजेशीर कॅप्शनही लिहिते.

स्री-2 सिनेमा
श्रद्धा कपूरचा स्री-2 सिनेमा स्वातंत्र्य दिनावेळी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी श्रद्धा कपूरने जोरदार प्रमोशनही केले आहेत. सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची फार उत्सुकता लागली आहे. स्री-2 सिनेमा याआधी आलेल्या ‘स्री’ सिनेमाचा सिक्वल आहे. यामध्ये श्रद्धा कपूरसह राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी झळकले होते. आता सिक्वलमध्येही तेच स्टार झळकणार आहेत.

प्रेक्षकांवर मानकाप्याची दहशत
स्री-2 सिनेमात मानकाप्याची दहशत दाखवण्यात आली आले. याशिवाय राजकुमार राव म्हणजेच विक्कीचे अधुरे प्रेम पूर्ण होणार आहे. हॉरर-कॉमेडी असणारा स्री-2 सिनेमा प्रेक्षकांना आता उद्यापासून सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे.

आणखी वाचा  

'शोले' ते 'एक था टायगर', बॉलिवूडमध्ये 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेत हे सिनेमे

Raksha Bandhan 2024 निमित्त मराठीतील पाहण्यासारखे 5 सदाबाहर सिनेमे

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?