राजकरणामुळे सिनेसृष्टीतील करिअवर प्रभाव पडतोय? कंगना राणौत म्हणते...

Published : Aug 13, 2024, 10:34 AM ISTUpdated : Aug 13, 2024, 10:35 AM IST
 Kangana Ranaut Instagram

सार

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौतने राजकरणातही एन्ट्री केली आहे. यामुळे कंगनाला सिनेमांच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाहीये. यावरच अभिनेत्रीने उघडपणे भाष्य केले आहे.

Kangana Ranaut on Movies : बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणौतने सिनेमांसह राजकरणाच्या जगात यश मिळवले आहे. अभिनेत्रीने नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी जागेवरुन विजय मिळवला होता. याच दरम्यान, कंगनाला विचारण्यात आले होते की, राजकरणात सक्रिय झाल्यानंतर पूर्णपणे सिनेमांना रामराम करणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटले होते की, माझी प्राथमिकता राजकरण राहणार आहेच. पण मी सिनेमे देखील करणार आहे. कंगनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, राजकरणात एन्ट्री केल्यानंतर माझ्या बॉलिवूडमधील करिअरवर परिणाम होत आहे.

काय म्हणाली कंगना राणौत?
कंगना राणौतने म्हटले की, लोकसभेची खासदार असल्यामुळे माझा कार्यभार वाढला आहे. राजकरणातील कामांमध्ये माझा सहभाग अधिक वाढला गेला आहे. आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण होते. मला प्रत्येक ठिकाणी जावे लागते. तेथील नागरिकांना भेटावे लागते. यामुळे माझ्या सिनेमातील करियरवर थोडा प्रभाव पडत आहे. माझी काही कामे अपूर्ण राहत आहेत. मी शूटिंगसाठी देखील जाऊ शकत नाही. संसदेच्या कामकाजांमुळे सिनेमांच्या शूटिंगला वेळ देता येत नाहीये.

अभिनय सोडणार?
अभिनेत्रीना पुन्हा अभिनयाबद्दल विचारले असता तिने म्हटले की, दोन्ही क्षेत्र व्यवस्थितीत पद्धतीने हँडल करेन. पुढे जाऊनही जो सोयीस्कर मार्ग असेल तो निवडणार आहे. मला जे आवडेल ते काम सर्वप्रथम करणार आहे. पण सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडत आहेत.

कंगना राणौतचा आगामी सिनेमा
कंगना राणौतने आताच स्पष्ट केले आहे की, राजकरण अथवा सिनेमा या दोघांपैकी एकाच गोष्टीला सध्या पसंत करत आहे. पण आगामी काळात कंगना कोणत्यातरी एकाच गोष्टीची निवड करणार आहे. कंगनाने बॉलिवूडमध्ये क्विन, थलायवी, तनू वेड्स मनू, रिवॉल्वर रानीसारखे सुपरहिट सिनेमे केले. अभिनयासह कंगना राणौत प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकही आहे. कंगना राणौतचा आगामी सिनेमा देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बायोपिकवर आधारित असणार आहे.

आणखी वाचा : 

श्रीदेवी यांच्या वाढदिवासानिमित्त बोनी कपूर यांनी शेअर केली भावूक पोस्ट

मी अजूनही विवाहित आहे...ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकने सोडले मौन

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!