सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हांनी घराला रोषणाई करत सजवला बंगला, पाहा PHOTOS

Published : Jun 22, 2024, 09:31 AM ISTUpdated : Jun 22, 2024, 11:41 AM IST
sonakshi sinha zaheer iqbal

सार

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्ह आणि जहीर इक्बाचे येत्या 23 जूनला लग्न असल्याची चर्चा आहे. याआधी शत्रुघ्न सिन्हांनी घराला सुंदर रोषणाई केल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding :  बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. लग्नाआधी दोन्ही कपलच्या प्री-वेडिंग फक्शनला सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका फोटोत शत्रुघ्न सिन्हांच्या रामायण घराला सुंदर रोषणाई केल्याचे दिसून आले.

सोनाक्षी सिन्हा गेल्य एक वर्षापासून स्वत:हून खरेदी केलेल्या घरात राहत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आपल्या घरात जहीरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

मेंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल
सोनाक्षीच्या लग्नसोहळ्यादरम्यान मेंदी सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये जहीर इकबाल होणारी पत्नी सोनाक्षी सह तिच्या मित्रपरिवारासोबत दिसला. यावेळी सोनाक्षीने चॉकलेटी रंगातील आउटफिट परिधान केले होते. याशिवाय जहीरनेही प्रिंटेड कुर्त्यासह पांढऱ्या रंगातील पजामा घातला होता. अशातच चाहत्यांकडून सोनाक्षीच्या मेंदी लूकचे कौतुक केले जात आहे.

सलमानने करुन दिली होती जहीर-सोनाक्षीची मैत्री
सोनाक्षी सिन्हाने वर्ष 2010 मध्ये आलेल्या ‘दबंग’ सिनेमातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. जहीर इक्बालने ‘नोटबुक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट सलमान खानने करुन दिली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि नंतर रिलेशनशिप सुरु झाले. या दोघांनी साखरपुडाही केल्याच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. यावर अद्याप कपलने मौन धरले आहे.

आणखी वाचा : 

Ishq-Vishq Rebound पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्यात अशा प्रतिक्रिया, म्हणाले...

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली जावयाची भेट, म्हणाले...

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!