Sonakshi Sinha-Zaheer Iqbal च्या लग्नावरुन वाद, शत्रुघ्न सिन्हांना घरासह परिवाराचे नाव बदलण्याचा इशारा

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नामुळे बिहारमधील हिंदू शिव भवानी सेना नाराज आहे. या संघटनेने पटनामध्ये पोस्टर लावत कपलच्या लग्नाला लव्ह जिहादचे रुप दिले आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हांनाही पटनात येऊ देणार नाही असेही पोस्टरवर म्हटलेय. 

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding :  बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा प्रियकर जहीर इक्बालसोबत 23 जूनला लग्नगाठ बांधली. दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केले. यानंतर मित्रपरिवाराला शिल्पा शेट्टीच्या बस्टियन रेस्टॉरंटमध्ये धमाकेदार पार्टी दिली. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अशातच पटना येथे कपलच्या विरोध करणारे पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत. हे पोस्टर्स हिंदू शिव भवानी सेनेकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोस्टर्सवर नक्की काय लिहिलेय?
हिंदू शिव भवानी सेनाने पोस्टर लावत त्यावर लिहिले आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे आहे. याशिवाय संपूर्ण देशाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न, शत्रुघ्न सिन्हा तुम्ही लग्नाच्या निर्णयावर पुर्नविचार करावा. नाही तर तुमची मुल लव आणि कुश यांना आपले घर रामायण याचे नाव तातडीने बदलण्यास सांगा. यामुळे हिंदू धर्माचा अपमान होत आहे.

लव कुमार सिंह उर्फ रुद्रने लावले पोस्टर
हिंदु शिव भवानी यांच्याकडून लावण्यात आलेल्या पोस्टर लावणाऱ्याने आपले नाव लव कुमार सिंह उर्फ रुद्र असल्याचे सांगितले आहे. पोस्टरवर लिहिले आहे की, हिंदू शिव भवानी सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हाला हिंदू शिव भवानी सेना बिहारमध्ये घुसू देणार नसल्याचेही पोस्टरवर लिहिले आहे.

प्रेमाच्या नावाखाली धार्मिक कट
पोस्टरवर असेही लिहिले आहे की, हिंदू धर्माला कमजोर आणि नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने सोनाक्षी सिन्हाचे लग्न प्रेमाच्या नावाखाली धार्मिक कट आणि अवैध धर्मांतरण आहे. यामुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळणार असून संपूर्ण देशाला इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजकरणात शत्रुघ्न सिन्हांना फायदा होणार?
शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालचे खासदार आहेत. दीर्घकाळ बिहारच्या राजकरणातही शत्रुघ्न सिन्हा सक्रीय होते. ते पटना साहिब येथून भाजपाचे खासदारही होते. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांसोबतच्या मतभेदामुळे शत्रुघ्न सिन्हांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम नागरिकांची संख्या अधिक आहे. अशातच शत्रुघ्न सिन्हांच्या चाहत्यांकडून अशी अपेक्षा केली जात आहे की, मुलीच्या लग्नाचा राजकीय फायदा शत्रुघ्न सिन्हांना होऊ शकतो. शत्रुघ्न सिन्हांनी आता पश्चिम बंगालच्या राजकरणात एण्ट्री केली आहे. सध्या पटनामध्ये शत्रुघ्न सिन्हांचा विरोध केला जात असला तरीही त्यांना काहीही फरक पडणार नाहीये.

आणखी वाचा : 

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शन पार्टीत रेखाची अदा, वळल्या सर्वांच्या नजरा

Sonakshi Sinha ने लग्नानंतर सर्वप्रथम सोशल मीडियात केला हा मोठा बदल

Share this article