सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालसोबतच्या लग्नाच्या अफवांवर दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली....

Published : Jun 12, 2024, 10:21 AM ISTUpdated : Jun 12, 2024, 10:22 AM IST
Sonkshi Sinha reaction on Her Wedding

सार

बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सोनाक्षीने लग्नाच्या अफवांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Sonakshi Sinha Reacts To Wedding Rumours :  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचा विवाह होणार असल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. सोनाक्षीचे लग्न कोणत्या ठिकाणी होणार, कोण येणार अशा सर्व गोष्टींबद्दल देखील बोलले जात आहे. याआधी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव सिन्हा यांनीही सोनाक्षीच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. पण आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालसोबतच्या लग्नाच्या अफवांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा?
सोनाक्षी सिन्हाने iDiva सोबत बातचीत करताना म्हटले की, "Firstly it's nobody's Business. याशिवाय ही माझी निवड आहे. यामुळे मला कळत नाहीये, काहींना माझ्या लग्नाची का काळजी वाटतेय. माझ्या पालकांपेक्षा अधिक अन्यजण मला लग्नाबद्दल सातत्याने विचारत आहेत. मी हे मजा म्हणून घेतेय. आता मला याची सवय झाली आहे. याचा काही फरक देखील मला पडत नाही. सर्वजण उत्सुक असले तरी आम्ही याबद्दल काय करू?"

लव्ह सिन्हाची प्रतिक्रिया
लव्ह सिन्हाने सोनाक्षीच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया देत म्हटले होते की, "मी यावर काहीही बोलणार नाही. यापेक्षा तुम्ही थेट सोनाक्षी किंवा अन्य कोणालातरी विचारा. या प्रकरणात माझ्याकडे काहीही बोलण्यासारखे नाही. "

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी मला सोनाक्षीच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल काहीही माहिती नाही. जहीर आणि सोनाक्षी लग्नाबद्दल सांगतील त्यावेळी आशीर्वाद देऊ असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. झूमसोबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर मी सध्या दिल्लीत आहे. सोनाक्षीच्या लग्नाबद्दल माझे अद्याप कोणाशीही बोलणे झालेले नाही. राहिला प्रश्न सोनाक्षीच्या लग्नाचा तर अद्याप तिने मला काहीही सांगितलेले नाही.

कुठे होणार लग्न
इंडिया टुडेनुसार, येत्या 23 जूनला मुंबईत सोनाक्षीचे लग्न होणार आहे. यावेळी खास मित्रमंडळींव्यतिरिक्त लग्नसोहळ्यात हिरामंडीमधील कास्टला आमंत्रण पाठवण्यात आले आहे. असे म्हटले जातेय की, लग्नाची पत्रिका एखाद्या मॅगझिन कव्हरसारखी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की, अफवा खऱ्या आहेत. पाहुण्यांना फॉर्मल आउटफिट परिधान करुन येण्यास सांगितले आहे. लग्नासोहळा मुंबईतील बॅस्टियनमध्ये साजरा होईल. दरम्यान, अद्याप अभिनेत्रीकडून लग्नाचे कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

आणखी वाचा : 

'आजकाल मुलं परवानगी घेत नाही, केवळ...', सोनाक्षी-जहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी केले धक्कादायक विधान

'फायर है मैं...'; डेविड वॉर्नरचा 'पुष्पाराज' स्वॅग पाहून अल्लू अर्जुनने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!