श्रेयस तळपदेच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या, अभिनेत्याने पोस्ट करत म्हटले...

Published : Aug 20, 2024, 09:02 AM ISTUpdated : Aug 20, 2024, 09:04 AM IST
Shreyas Talpade

सार

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘वेलकम टू जंगल’ सिनेमाचे शूटिंग करत आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून त्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टीसह काही कलाकार झळकणार आहेत. अशातच श्रेयस तळपदेच्या मृत्यूची बातमी उडाली. यावर अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Shreyas Talpade Social Media Post : मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली गेली. यामुळे चाहते हैराण झाले होते. अचानक श्रेयसबद्दलची अशी बातमी आल्याने नक्की काय झाले याचा शोध चाहत्यांकडून घेऊ लागला होता. पण श्रेयसला त्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे कळले असता त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. श्रेयसने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयस तळपदेची पोस्ट
श्रेयस तळपदेने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रिय मित्रांनो, मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जीवंत, आनंदी आणि हेल्दी आहे. माझ्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबद्दल कळले. मला कळते की, मजा-मस्ती करण्यासाठी एक वेगळी वेळ असते. पण याचा चुकीचा वापर होत आहे. यामुळे वास्तविकरित्या नुकसान होऊ शकते. खरंतर, एखाद्याने मसा-मस्ती म्हणून पोस्ट शेअर केली होती. पण आता अनावश्यक चिंता निर्माण झाली आहे.”

अफवांचा होतो परिवारावर होतो परिणाम- श्रेयस
अभिनेत्याने पुढे म्हटले की, “माझी लहान मुलगी आहे जी दररोज शाळेत जाते. आधीच तिच्या भविष्याबद्दल चिंतेत आहे. अशातच माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे मुलीमधील भीती अधिक वाढली गेली आहे. मुलीला मैत्रीणी आणि शिक्षकांच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. श्रेयने सोशल मीडिया युजर्सला त्याच्या निधनाच्या बातमीबद्दल चुकीची माहिती शेअर करू नये अशी विनंती केली आहे. याचा परिणाम परिवारासह लहान मुलांवरही होत आहे.”

माझ्या शुभचिंतकांसाठी धन्यवाद
अभिनेत्याने पुढे म्हटले की, काहींनी सच्चा प्रेमाने माझ्या भल्यासाठी प्रार्थना केली आहे. अशातच मृत्यूच्या खोट्या बातम्यांमुळे भावना दुखावल्या जातात. माझ्या चाहत्यांना याचा धक्का बसू शकतो. ज्यावेळी मृत्यू संदर्भातील बातम्या शेअर करता त्याचा परिणाम व्यक्तीवरच नव्हे त्याच्या परिवारसह अन्य काही गोष्टींवर देखील होतो. याशिवाय शुभचिंतकांचे श्रेयसने अखेर आभारही मानले आहेत. तुमचे प्रेम, चिंता माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असेही श्रेयसने चाहत्यांना म्हटले आहे.

श्रेयसचा आगामी सिनेमा
श्रेयस तळपदे लवकरत ‘वेलकम टू जंगल’ सिनेमात झळकणार आहे. यामध्ये श्रेयसची खास भूमिका असणार आहे. गेल्या वर्षी सिनेमाची पहिली झलक समोर आली होती. या कॉमेडी सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडीस, परेश रावल, अरशद वारसीसह काही कलाकार झळकणार आहेत.

आणखी वाचा : 

Chhaava Teaser : अंगावर काटा आणणारा विक्कीच्या 'छावा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

War 2 सिनेमाच्या शूटिंग सेटवर ज्युनियर NTR गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!