War 2 सिनेमाच्या शूटिंग सेटवर ज्युनियर NTR गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

Published : Aug 19, 2024, 11:14 AM IST
Jr NTR

सार

Junior NTR Injured : 200 कोटी रुपयांचे बजेट असणारा वॉर-2 सिनेमाच्या सेटवर अभिनेता ज्युनियर एनटीआरला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ओपनिंग सीनवेळी ही दुर्घटना घडली आहे.

Junior NRT Injured on Movie Set :  तेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर ‘वॉर-2’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. 200 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता वॉरचा दुसरा भाग तयार केला जात आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर हृतिक रोशनसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. असे सांगितले जातेय की, सिनेमातील एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगवेळी ज्युनियर एनटीआर यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे सध्या अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्युनियर एनटीआर रुग्णालयात दाखल
आया मुखर्जी द्वारे दिग्दर्शित केला जाणारा वॉर-2 सिनेमात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात दोन्ही स्टार्सचा एक शानदार ओपनिंग सीन आहे. याच सीनच्या शूटिंगवेळी ज्युनियर एनटीआर गंभीर रुपात जखमी झाला आहे. अभिनेत्याच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे ज्युनियर एनटीआरला डॉक्टरांनी दोन महिन्याचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे वॉर-2 सिनेमाच्या शूटिंगसाठी अजून वेळ लागणार आहे.

मुंबई अथवा इटलीच्या ठिकाणी होणार शूटिंग
प्रोडक्शन टीमने वॉर-2 सिनेमाचे शूटिंग मुंबई अथवा इटलीत करण्याचा विचार केला आहे. ज्युनियर एनटीआरचा ओपनिंग सीन मुंबईत शूट केला जात होता. आता दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर ऑक्टोंबर महिन्यात शूटिंग पुन्हा सुरु होणार आहे, ज्युनियर एनटीआर सेटवर परतण्यापर्यंत इटलीत गाण्यांचे शूट केले जाणार आहे.

ज्युनियर एनटीआरचा सिनेमा
ज्युनियर एनटीआर देवरा सिनेमात झळकणार आहे. सिनेमा येत्या 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचे निर्देशन कोराटला शिव यांच्याकडून करण्यात आले आहे. सिनेमात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आणखी वाचा : 

Raksha Bandhan : बॉलिवूडमधील अतूट प्रेम असणाऱ्या भावाबहिणीच्या जोड्या

मोहनलाल आजारी: सुपरस्टारला श्वास घेण्यास त्रास, तातडीने रुग्णालयात दाखल

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!