
Chhaava Teaser Out : विक्की कौशलचा आगामी सिनेमा ‘छावा’ चा टीझर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी छावाचा टीझर निर्मात्यांनी रिलीज करत विक्कीच्या चाहत्यांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवली आहे. याआधी विक्की कौशलने सिनेमाचा टीझर कधी प्रदर्शित होणार या संबंधित एक पोस्ट शेअर केली होती. आता टीझर शेअर करत एक खास कॅप्शनही विक्कीने लिहिले आहे. विक्कीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "स्वराज्याचे संरक्षण करणारा, धर्माचा रक्षक, छावा- एका धाडसी योद्धाची महागाथा". सिनेमा येत्या 6 डिसेंबरला छावा प्रदर्शित होणार आहे.
छावा सिनेमाचा टीझर रिलीज
विक्की कौशलच्या छावा सिनेमाचा टीझर धमाकेदार आहे. टीझरची सुरुवात विक्की कौशलच्या भूमिकेपासून होत आहे. युद्धाचा सीन देखील दाखवण्यात आला आहे. याशिवाय बॅकग्राउंडला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही ओळींचा आवाज येतोय. विक्की कौशलने सिनेमात एक धाडसी योद्धाच्या रुपात अतिशय तडफदार भूमिका साकारली आहे. यामुळे प्रेक्षकांना आता विक्कीचा सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
सिनेमाची कथा
छावा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात विक्की कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. टीझरआधी विक्कीने सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते.
प्रेक्षकांकडून विक्कीच्या भूमिकेचे कौतूक
विक्की कौशलच्या छावा सिनेमातील भूमिकेमुळे त्याचे प्रेक्षकांकडून तोंडभरुन कौतुक केले जात आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर, गायक यशराज मुखाटे यांनी देखील टीझरखाली कमेंट्स केली आहे. याशिवाय एका युजरने म्हटले की, टीझर पाहून अंगावर काटा येईल. छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो.
आणखी वाचा :
Stree 2 Day 4 Collection : श्रद्धा कपूरच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई
War 2 सिनेमाच्या शूटिंग सेटवर ज्युनियर NTR गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल