
Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा ‘स्री-2’ मुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमीच चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत असते. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील स्टोरीवर कलाकार राहुल मोदीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. खरंतर, राहुलसोबत श्रद्धा कपूरचे रिलेशनशिप सुरुय अशी चर्चा आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी श्रद्धाकडील आर (R) नावाच्या पेंडेंटनेही सर्वांचे लक्ष वेधले. सुट्टीचा आनंद लुटतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर श्रद्धाच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे. यावर अद्याप श्रद्धाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
श्रद्धा कपूरची इंस्टाग्रामवरील पोस्ट
रिलेशनपिच्या चर्चा सुरु असतानाच श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवरील स्टोरीत एक सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये श्रद्धासोबत राहुल मोदीही दिसत आहे. याशिवाय श्रद्धाने स्टोरीवर "दिल रख ले, नींद तो वापिस दे दे यार. राहुल मोदी" असेही लिहिले आहे.
श्रद्धाच्या गळ्यातील नेकलेस
‘आशिकी-2’ सिनेमामध्ये झळकलेल्या श्रद्धाने काही सेल्फी फोटो शेअर केले होते. यामध्ये आर नावाचा नेकलेस घातल्याचे दिसून आले. यावरुनही रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर पडकला होता.
श्रद्धाच्या कामाबद्दल थोडक्यात…
श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री लवकरच स्री-2 सिनेमातून झळकणार आहे. सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा :
Alka Yagnik गंभीर आजाराने ग्रस्त, गायिकेला दोन्ही कानांनी ऐकू न येणे झालेय बंद
शाहरुख खानने 1 रुपयात साइन केला होता 'Nayak' सिनेमा, सोडण्यामागील ठरले हे कारण