Independence Day 2024 : बॉलिवूडमधील सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांकडून खास दिवसचा शोध घेतला जातो. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूया.
यंदाच्या 15 ऑगस्टला पाच मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये राजकुमार राव-श्रद्धा कपूर स्टारर 'स्री-2', जॉन अब्राहमचा 'वेदा' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल मे' सिनेमाचा समावेश आहे. अशातच स्री-2 सिनेमासाठी प्रेक्षकांकडून मोठ्या उत्साहाने वाट पाहिली जात आहे. पण बॉलिवूडमध्ये याआधी देखील 15 ऑगस्टला काही सिनेमे प्रदर्शित झाले होते. याच सिनेमांसह त्यांच्या कमाईबद्दल जाणून घेऊया. 15 ऑगस्टला रिलीज झालेल्या लिस्टमध्ये 49 वर्षांपूर्वी आलेल्या 'शोले' ते सलमान खानच्या 'तेरे नाम' पर्यंतच्या सिनेमाचा समावेश आहे.
15 ऑगस्ट, 2003 मध्ये सलमान खानचा तेरे नाम सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. सिनेमाची कथा राधे आणि निर्जरा यांच्या अनोख्या लव्ह स्टोरीवर आधारित होती. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने धुमाकूळ घातला होता. 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेरे नाम सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 24 कोटी रुपयांची कमाई केली होती.
कबीर खान यांची दिग्दर्शित केलेला ‘एक था टायगर’ सिनेमा वर्ष 2012 रोजी 15 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत झळकला होता. सलमानचा एक था टायगर सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण सिनेमाने तब्बल 300 कोटी रुपयांचा आकडा पार केला होता.
‘बचना ए हसीनों ’सिनेमात दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, बिपाशा बासू आणि मनिषा लांबा अशा कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा 15 ऑगस्ट, 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 62 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मिलाप जावेरी यांनी दिग्दर्शित केलेला 'सत्यमेव जयते' सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकला होता. सत्यमेव जयते सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 121 कोटी रुपयांची कमाई केली होती. यंदा जॉन अब्राहमचा 15 ऑगस्टला 'वेदा' सिनेमा रिलीज होणार आहे.
रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला ‘शोले’ सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी अशा तगड्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. सिनेमा 3 कोटी रुपयांत तयार करण्यात आला होता. पण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 50 कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांना जय-वीरूची जोडी फार पसंत पडली होती.
आणखी वाचा :
Independence Day 2024 : मनामनातील देशभक्ती जागवणारे सिनेमातील 10 दमदार डायलॉग्स