
Shah Rukh Khan Viral Video : नुकत्याच 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानला त्याच्या योगदानासाठी कॅरियर लेपर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणारा शाहरुख खान पहिलाच भारतीय सेलिब्रेटी आहे. या वेळचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शाहरुखवर जोरदार टीका केली जात आहे.
शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल
शनिवारी लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर शाहरुखान खानने एका वृद्ध व्यक्तिला धक्का दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, शाहरुख खान रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससोबत उभा असलेल्या एका वृद्धाला धक्का देत पुढे जात आहे. यावरुनच शाहरुख खानवर टीका केली जात आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
काहीजणांनी शाहरुखनच्या अशा वागण्यावर टीका करण्यात सुरुवात केली आहे. काहींनी शाहरुखच्या वागण्याला अहंकारी असे म्हटले आहे. याशिवाय अन्य युजर्सने, शाहरुखला तुझ्यासोबत असे कोणी वागले असते तर काय झाले असते? असाही प्रश्न विचारला आहे.
शाहरुखला काहींचा पाठिंबा
शाहरुख खानच्या बाजूनेही काहींनी बोलण्यास सुरुवात केले आहे. काहींनी म्हटले की, शाहरुख खान आणि तो वृद्ध व्यक्ती उत्तम मित्र आहेत. ही एक मस्ती होती. शाहरुख खानच्या चाहत्यांनी या घटनेच्याआधीचे काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये शाहरुख वृद्ध व्यक्तीसोबत हसताना दिसत आहे.
दरम्यान, व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुख खानचा अखेरचा सिनेमा पठाण होता. वर्ष 2024 मध्ये अभिनेत्याने कोणत्याही सिनेमाची घोषणा केलेली नाही.
आणखी वाचा :
Pushpa 2 सिनेमातील आयटम सॉन्गसाठी समंथा नव्हे या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा
Bigg Boss च्या घरात एन्ट्रीसाठी काळी जादू? या स्पर्धकाचे धक्कादायक खुलासे