Pushpa 2 सिनेमातील आयटम सॉन्गसाठी समंथा नव्हे या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

Published : Aug 11, 2024, 03:24 PM ISTUpdated : Aug 11, 2024, 03:25 PM IST
Allu Arjun Pushpa 2 Teaser

सार

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Pushpa-2 Movie Updates : अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला होता. सिनेमातील सर्व गाण्यांवर रिल्स, व्हिडीओ कंटेट तयार करण्यात आले. याच सिनेमातील आयटम सॉन्गही सुपरहिट झाले होते. या गाण्यात सामंथा रुथ प्रभू झळकली होती. पण पुष्पा-2 सिनेमात सामंथाचे आयटम सॉन्ग नसणार आहे. आयटम सॉन्गची ऑफर सामंथाने नाकारली आहे. अशातच सिनेमात सामंथा नाही तर कोण करणार आयटम सॉन्ग अशी चर्चा जोरदार सुरु झाली आहे. यासाठी दोन नावे घेतली जात आहेत.

सिनेमात आयटम सॉन्ग कोण करणार?
असे मानले जात आहे की, बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर पुष्पा-2 सिनेमात आयटम सॉन्ग करु शकते. जान्हवीच्या नावाची आधीपासूनच चर्चा सुरु आहे. याशिवाय साउथमधील अभिनेत्री श्रीलीलाचेही नाव चर्चेत आहे. पण अद्याप कोणाचाही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पुष्पा सिनेमातील Oo Antava Oo Oo Antava गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. दरम्यान, पुष्पा-2 सिनेमाची स्क्रिप्ट लहान करण्याच्या नादात गरज भासल्यास आयटम सॉन्ग काढून टाकण्याची शक्यता आहे.

पुष्पा सिनेमाची कमाई
कोरोनाच्या काळात आलेल्या पुष्पा सिनेमाने जगभरात आपला डंका वाजवला होता. सिनेमाने 350 कोटी रुपये कमावले होते. सिनेमात रश्मिका मंदाना, अल्लू अर्जुन आणि फदाह फाजिलसारखे तगडे स्टार झळकले होते. आता पुष्पा-2 सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचीही प्रेक्षकांकडून आतुरतेने वाट पहिली जात आहे.

ट्रेन्ड सेटर ठरला होता पुष्पा सिनेमा
सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास बाहुबलीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुष्पा सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमा कोरोनाच्या काळात रिलीज झाला होता. तरीही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटी रुपयांची तगडी कमाई केली होती.

आणखी वाचा :

Bigg Boss च्या घरात एन्ट्रीसाठी काळी जादू? या स्पर्धकाचे धक्कादायक खुलासे

सिनेमांवर टिका करण्यावरुन अक्षय कुमारने केले धक्कादायक विधान

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!