साउथ सिनेमातील महिलांच्या लैंगिक अत्याचारावर समंथाने केली मोठी मागणी, म्हणाली...
Hema Committee report impact : हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर साउथ सिनेमातील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा तापला आहे. काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला आहे. अशातच समंथानेही एक मोठी मागणी केली आहे.
नुकत्याच मल्याळम सिनेसृष्टीत महिलांवर केल्या जाणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा करणारा हेमा कमिटीचा रिपोर्ट समोर आला. या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे देखील झाली आहे. यामध्ये काही बड्या अभिनेत्यांनी अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.
हेमा कमिटीचा रिपोर्ट
हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचारावर उघडपणे भाष्य केले आहे. तमिळ सिनेसृष्टीत हेमा कमेटीच्या आधारावर एका समितीची गठन करण्यात आले आहे. जेणेकरुन अभिनेत्रींची सुरक्षितता राखली जाईल असे अभिनेता संघाचे महासचिव विशाल यांनी म्हटले आहे. लवकरच या समितीची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
समंथाची प्रतिक्रिया
अभिनेत्री समंथाने तेलंगणा सरकारला तेलुगु सिनेसृष्टीत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा तपास करणाऱ्या समितिचा रिपोर्ट जारी करण्याची मागणी केली आहे. तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमधील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी समंथा पहिली अभिनेत्री आहे. समंथाने म्हटले की, रिपोर्ट जारी केल्यास महिलांच्या सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल.
समंथाचा रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी
असे मानले जात आहे की, अभिनेत्री समंथाच्या पोस्टनंतर लवकरत तेलुगु सिनेसृष्टीत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येऊ शकतात. तेलुगु सिनेमात काम करणाऱ्या महिलांसाठी वर्ष 2019 मध्ये 'द वॉइस ऑफ वुमन' नावाने एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये समंथाचा देखील समावेश होता. समंथाने आपल्या इंस्टाग्रामवर याच समितीकडून जारी केलेला रिपोर्ट शेअर केला आहे.