आज सावरकरांची 141 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रणदीप हुड्डा यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलला भेट दिली. जिथे सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. रणदीपने पत्नी लिन लैश्रामसोबत सेल्युलर जेलला भेट दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील बायोपिक 'स्वातंत्र्य वीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुडा यावर्षी दिसला. यामध्ये अभिनेत्याने सावरकरांची प्रमुख भूमिका केली होती.आज सावरकरांची 141 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रणदीप हुड्डा यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलला भेट दिली. जिथे सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. रणदीपने पत्नी लिन लैश्रामसोबत सेल्युलर जेलला भेट दिली आहे.
रणदीप हुडा म्हणाला- 'मी त्याची भूमिका दमदारपणे साकारली' :
रणदीप हुड्डा म्हणाला, 'वीर सावरकरांची कथा वाचताना आणि ती पडद्यावर साकारताना माझा त्यातला सहभाग खूप वाढला आहे. वीर सावरकरजींचे मर्म समजून घेणाऱ्या लोकांकडून मला कौतुकाची थाप मिळाली तेव्हा खूप छान वाटते. त्यांची कथा मी खूप चांगल्या आणि दमदार पद्धतीने पडद्यावर आणली आहे.आज आम्ही इथे सेल्युलर जेलमध्ये आलो आहोत, जिथे विनायकजींना शिक्षा झाली होती. 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा...सर्व शक्तिशाली क्रांतिकारकांना इंग्रजांनी देशापासून दूर एकांतात ठेवले होते आणि हे ठिकाण आहे...'.
चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः केले :
पडद्यावर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डा यांनी खूप मेहनत घेतली. त्याच्यात अप्रतिम परिवर्तन झाले. वीर सावरकरांच्या भूमिकेत येण्यासाठी त्यांनी सुमारे ३२ किलो वजन कमी केले. या चित्रपटात मुख्य भूमिकेसह, अभिनेत्याने त्याचे दिग्दर्शनही केले आहे.
भूमिका साकारताना काय वाटलं :
सवातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारताना मी जेव्हा सेल्युलर जेलमध्ये भेट दिली तेव्हा वाटलं होत खूप अवघड आहे भूमिका साकारणं पण मनाशी ठाम निश्चय केला आणि पुढे गेलो. आज मला अभिमान आहे की मी त्यांची मेहनत मोठ्या पडद्यावर आणू शकलो आणि मांडू शकलो.
आणखी वाचा :
अवघ्या 72 तासात दीपिका पादुकोणच्या मॅटरनिटी Yellow गाउनचा लिलाव, किंमत ऐकून चक्रावाल
शाहरुख खानच्या 'लुट-पुट गया' गाण्यावर थिरकली अनन्या पांडे, पाहा KKR संघाच्या पार्टीचा धमाकेदार VIDEO