अवघ्या 72 तासात दीपिका पादुकोणच्या मॅटरनिटी Yellow गाउनचा लिलाव, किंमत ऐकून चक्रावाल

Published : May 28, 2024, 10:57 AM ISTUpdated : May 28, 2024, 10:59 AM IST
Deepika Padukone Yellow Gown

सार

बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरी लवकरच एका चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. अशातच नुकतेच दीपिकाला एका पिवळ्या रंगातील मॅटरनिटी गाउनमध्ये स्पॉट करण्यात आले. या गाउनमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती.

Entertainment : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) घरी लवकरच लहान बाळाचे आगमन होणार आहे. सध्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरही आई होण्याचा एक वेगळाच ग्लो दिसून येत आहे. अशातच दीपिका पादुकोणला नुकतेच एका इवेंटवेळी स्पॉट करण्यात आले. यावेळी दीपिकाने पिवळ्या रंगातील सुंदर असा गाउन परिधान केला होता. यामध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. पण दीपिकाच्या गाउनचा चक्क 72 तासांमध्ये लिलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय गाउनची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच चक्रावाल हे खरंय.

दीपिकाने लिलाव केला गाउन
दीपिका पादुणकोण शुक्रवारी (24 मे) आपल्या 82°E नावाच्या ब्युटी ब्रँडच्या एका कार्यक्रमात सहभागी होत होती. यावेळी अभिनेत्रीनेचा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दीपिकाने पिवळ्या रंगातील सुंदर असा गाउन परिधान केला होता. याच गाउनची नंतर जोरदार चर्चा सुरू झाली. अशी बातमी समोर आली आहे की, दीपिकाने पिवळ्या रंगातील गाउनचा लिलाव केला आहे. याची माहिती अभिनेत्रीने स्वत: इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. याशिवाय पोस्टखाली एक कॅप्शनही लिहिले आहे.

गाउनची लिलावातील किंमत
अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवरील स्टोवर एक लिंक देत त्यामध्ये गाउनच्या किंमतीबद्दल सांगितले आहे. दीपिकाचा पिवळ्या रंगातील गाउन चक्क 34 हजार रुपयांना विक्री करण्यात आला आहे. अभिनेत्री गाउनच्या लिलावाची रक्कम दान करणार आहे.

सप्टेंबरमध्ये घरी येणार पाहुणा
दीपिका पादुकोणच्या घरी यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवा चिमुकला येणार आहे. यामुळे दीपिकासह रणवीरच्या घरातील मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण दीपिकाच्या प्रेग्नेंसीमुळे उत्सुक आहे.

अभिनेत्रीचा आगामी सिनेमा
दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्रीने अखेरचा सिनेमा 'फायटर' केला होता. अशातच अभिनेत्री लवकरच रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सिंघममध्ये झळकणार आहे. हा सिनेमा येत्या दिवाळीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दीपिकासह रणवीर सिंह देखील सिनेमात झळकणार आहे. याव्यतिरिक्त दीपिका पादुकोण प्रभासचा सिनेमा 'कल्कि 2898AD' मध्ये देखील झळकणार आहे.

आणखी वाचा : 

Panchayat Season 4 संदर्भात निर्मात्यांची मोठी घोषणा, प्रेक्षकांना एवढ्या भागापर्यंत घेता येणार मनोरंजनाची मजा

शाहरुख खानच्या 'लुट-पुट गया' गाण्यावर थिरकली अनन्या पांडे, पाहा KKR संघाच्या पार्टीचा धमाकेदार VIDEO

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!