Pushpa : The Rise मधील अभिनेत्याला अटक, ज्युनिअर आर्टिस्टचा छळ केल्याचा गंभीर आरोप

Entertainment News: सिनेमा “पुष्पा: द राईज” अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. आपल्या ज्युनिअर आर्टिस्टचा छळ केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 8, 2023 7:37 AM IST / Updated: Dec 09 2023, 11:26 AM IST

Entertainment : सिनेमा "पुष्पा: द राईज" (Pushpa: The Rise) पुष्पा राजचा दाखवण्यात आलेला मित्र केशव याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जगदीश प्रताप भंडारी (Jagadeesh Prathap Bandari) असे त्याचे नाव आहे. जगदीशवर ज्युनिअर आर्टिस्टचा छळ केल्याचा आरोप आहे. ज्युनिअर आर्टिस्टने गेल्या महिन्यात 29 नोव्हेंबरला (2023) आत्महत्या केली होती.

जगदीशवरील गंभीर आरोप
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जगदीश ज्युनिअर आर्टिस्टसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होता. जगदीशने आपल्या ज्युनिअर आर्टिस्टकडून त्या दोघांचे काही खासगी फोटो घेतले होते.कथित रूपात जगदीश या मुलीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देत होता. 

14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
ज्युनिअर आर्टिस्टने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे रिपोर्ट्सच्या आधारे सांगण्यात आले आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पंजागुट्टा पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरू केला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासानंतर पोलिसांना जगदीश हा तिला कथित रूपात त्रास द्यायचा हे कळले. पोलिसांनी बुधवारी (6 डिसेंबर, 2023) जगदीशला ताब्यात घेत कोर्टात हजर केले. कोर्टाने आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केली तक्रार
कथित रूपात, ज्युनिअर आर्टिस्टच्या वडिलांनी आपल्या मुलीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली होती. आयपीसी कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत आरोपी जगदीशला अटक करण्यात आली आहे. जगदीशला हैदराबादच्या पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. जगदीश आणि त्याच्या परिवाराने या संपूर्ण घटनेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा: 

ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

Bollywood Update : गुटख्याच्या जाहिरातीत आता हा सुपरस्टार दिसणार नाही, कारण…

Share this article