कॉमेडियन ज्युनियर मेहमूद यांची पोटाच्या कॅन्सरशी झुंज, शरीराचे काही अवयवही झाले निकामी

Junior Mehmood Suffering Stomach Cancer : बॉलिवूडमधील कित्येक सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारे अभिनेते ज्युनिअर मेहमूद पोटाच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे.

 

Harshada Shirsekar | Published : Dec 7, 2023 2:56 PM IST / Updated: Dec 07 2023, 08:30 PM IST

Junior Mehmood Suffering Stomach Cancer : मनोरंजन विश्वातील एक वाईट वृत्त समोर आले आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपले अप्रतिम अभिनय कौशल्य दाखवणारे ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांची प्रकृती सध्या अतिशय नाजूक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोटाच्या कॅन्सरमुळे ज्युनिअर मेहमूद यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. 

या आजारामुळे 67 वर्षीय ज्युनिअर मेहमूद यांच्या शरीराचे काही अवयव देखील निकामी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी ज्युनिअर मेहमूद यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. दोघांच्या हा भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आजारपणामुळे ज्युनिअर मेहमूद यांची प्रकृती किती खालावली आहे, याची माहिती व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे समोर आली.

आजाराबाबत कधी समजले?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्युनिअर मेहमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांच्या माध्यमातून त्यांच्या आजाराबाबतची माहिती समोर आली. काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ज्युनिअर मेहमूद यांना आजाराबाबत महिन्याभरापूर्वीच समजले, त्यावेळेस हा आजार चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. यामुळे त्यांच्या शरीरातील फुफ्फुसांसह अन्य अवयवही निकामी झाले आहेत. 

डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की आता ते केवळ 40 दिवस जगू शकतात. पण आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. तब्बल दोन महिने ते आजारी होते, सुरुवातीला कुटुंबीयांना वाटलं की त्यांना काही तरी त्रास होत असावा. पण अचानक शरीराचे वजन घटू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासाअंती पोटाचा कॅन्सर चौथ्या टप्प्यात पोहोचल्याचे समजले”.

200 हून अधिक सिनेमांमध्ये केले काम

ज्युनिअर मेहमूद यांनी आपल्या कारर्कीदीमध्ये जवळपास 200 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. 1967 साली त्यांनी ‘नौनिहाल’ सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर परिवार, ब्रह्मचारी, फरिश्ता, विश्वास, प्यार ही प्यार, दो रास्ते, कटी पतंग, घर घर की कहानी, आन मिलो सजना, कारवां हंगामा, खोज, आपकी कसम, खूब का कर्ज, कर्ज चुकाना है, जुदाई यासारख्या सिनेमांमध्येही काम केले. याव्यतिरिक्त काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. तसेच जवळपास सहा मराठी सिनेमांचीही त्यांनी निर्मिती केली आहे.

आणखी वाचा :

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

Bollywood Update : गुटख्याच्या जाहिरातीत आता हा सुपरस्टार दिसणार नाही, कारण…

Share this article