Pushpa 2 Song Angaaron : 'पुष्पा 2' सिनेमातील दुसऱ्या गाण्याचा टीझर प्रदर्शित, श्रीवल्लीच्या अदांवर चाहते फिदा (Watch Video)

Published : May 24, 2024, 08:55 AM IST
Pushpa 2 Angaaron (The Couple Song)

सार

Pushpa 2 Song Angaaron : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा पुष्पा 2 मधील दुसऱ्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Pushpa 2 Song Angaaron Teaser :  अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा आगामी सिनेमा 'पुष्पा द रूल' आपल्या नव्या गाण्यामुळे चर्चेतत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी 'पुष्पा 2' मधील दुसऱ्या गाण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी सिनेमाच्या गाण्याचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रश्मिका मंदाना काही डान्स स्टेप्स करताना दिसून येत आहे. रश्मिकाच्या गाण्यातील अदांनी चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

टीझरमधील रश्मिकाच्या अदांवर चाहते फिदा
सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर गाण्याचा एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यामध्ये रश्मिका कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे. यानंतर रश्मिका गाण्यामधील हुक स्टेप्स करताना दिसून येत आहे. यंदा रश्मिका 'अंगारों' गाण्यावर पुष्पराजसोबत डान्स करताना दिसून येणार आहे. याआधी गाण्याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.

सिनेमाचा टायटल ट्रॅक
पुष्पा 2 सिनेमाचा टायटल ट्रॅक 'पुष्पा-पुष्पा' नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या गाण्यामध्ये अल्लू अर्जुनचा सामान्य व्यक्ती ते पुष्पा होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांनी पसंत केले असून त्यावरील व्हिडीओ आणि रिल्सही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिनेमाचा टीझर
8 एप्रिलला 'पुष्पा 2 द रुल' च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनने साडी नेसण्यासह चेहऱ्यावर लाल आणि निळ्या रंगातील रंग लावल्याचे दिसून आले होते. याशिवाय हेव्ही मेकअप आणि ट्रेडिशनल सोन्य आणि फुलांचे दागिने घातल्याचे दिसून आले होते. पुष्पा 2 सिनेमाच्या अनोख्या टीझरने चाहत्यांची मने जिंकली असून आता सिनेमा प्रदर्शित होण्याची आवर्जुन वाट पाहिली जात आहे.

दरम्यान, सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात रश्मिका मंदाना, अल्लू अर्जूनसह फहद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. याशिवाय सिनेमा येत्या 15 ऑगस्ट, 2024 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 

आणखी वाचा : 

Bigg Boss OTT 3 : प्रीमियरची तारीख अखेर ठरली... या दिवशी प्रदर्शित होणार शो, सलमान नव्हे हा स्टार करणार सूत्रसंचालन

Munjya: 'मुंज्या'च्या ट्रेलरच्या तारीख आली समोर, निर्मात्यांनी शेअर केले चित्रपटाचे आणखी एक पोस्टर

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!