'भाभीजी घर पर है' या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते फिरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. फिरोज हे अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठी लोकप्रिय होते. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
एंटरटेनमेंट डेस्क : भाभीजी घर पर है’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते फिरोज खान यांचं निधन झालं आहे. अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून देखील त्यांना ओळखल जायचं. गुरुवारी 23 मे रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
उत्तरप्रदेशमधील बदायूं इथं राहणारे प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते फिरोज खान यांचं निधन झालं आहे. फिरोज खान यांना अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट म्हटलं जायचं. ते हुबेहूब बिग बींसारखी नक्कल आणि अभिनय करायचे. यामुळे चाहत्यांमध्ये ते ‘फिरोज खान अमिताभ डुप्लीकेट’ नावाने लोकप्रिय होते. त्यांनी आजवर बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘भाभीजी घर पर है’, ‘जीजा जी छत पर है’, ‘साहब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘शक्तीमान’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय गायक अदनान सामीच्या सुपरहिट ठरलेल्या ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’ या गाण्यातही ते झळकले होते.
अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख :
फिरोज खान यांना अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून देखील ओळखलं जायचं. त्यांच्या ४ मे रोजी झालेल्या शेवटच्या कार्यक्रमामध्ये देखील बिग बी यांची मिमिक्री केली होती. याशिवाय ते दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र, सनी देओल यांची सुद्धा नक्कल करायचे. दरम्यान, फिरोज खान यांचं निधन झाल्यावर त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा :
Munjya: 'मुंज्या'च्या ट्रेलरच्या तारीख आली समोर, निर्मात्यांनी शेअर केले चित्रपटाचे आणखी एक पोस्टर
किरण राव आणि आमिरला यांच्या दबावामुळे करावे लागले लग्न, म्हणाली- आम्ही एक वर्ष डेट केले...