Pushpa 2 Release Date : अल्लू अर्जुनचा नवा सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख अखेर ठरली, या दिवशी होणार रिलीज

Published : Jun 18, 2024, 07:35 AM ISTUpdated : Jun 18, 2024, 07:39 AM IST
Pushpa-2 Movie New Release Date

सार

Pushpa 2Movie Update  : साउथ अभिनेता अल्लू अर्जुनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पुष्पा-2 सिनेमाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुनने राखाडी रंगातील टी-शर्ट आणि चॉकलेटी रंगातील शर्ट घातले आहे.

Pushpa 2 Release Date : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘पुष्पा-2 द रुल’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 सिनेमा येत्या 15 ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण सिनेमाची आता रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. यामुळेच चाहत्यांकडून सिनेमाची प्रदर्शित होण्याची नवी तारीख कोणती असणार याची वाट पाहिली जात होती. यावर निर्मात्यांनी पूर्णविराम लावत पुष्पा-2 सिनेमाची नवी तारीख जाहीर केली आहे.

अल्लू अर्जुनची इंस्टाग्रामवरील पोस्ट
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पुष्पा-2 सिनेमाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुन पुष्पाच्या भूमिकेत दिसून येत आहे. अल्लू अर्जुनने ग्रे रंगातील शर्ट आणि त्यावर ब्राउन रंगातील शर्ट घातल्याचे दिसून येत आहे. हातात अभिनेत्याने तलवार घेतल्याचेही दिसतेय. अर्जुनचा पोस्टरमधील लूक पाहून चाहत्यांना अधिकच सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

सिनेमाची नवी तारीख अखेर ठरली
अल्लू अर्जुनने पुष्पा-2 सिनेमा प्रदर्शित होण्याची नवी तारीख जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टखाली अभिनेत्याने असे लिहिलेय की, पुष्पा-2 रुल सिनेमा येत्या 6 डिसेंबर, 2024 ला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल. म्हणजेच आता स्पष्ट झालेय की, पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे. (Pushpa-2 Movie New Release Date)

सिनेमाबद्दल थोडक्यात…
पुष्पा-2 सिनेमाची कथा दिग्दर्शक सुकुमार आणि श्रीकांत विसा यांनी लिहिली आहे. सिनेमासाठी संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. पुष्पा-2 सिनेमात सामंथा रुथ प्रभूचा कॅमिओ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पुष्पा-2 सिनेमा याआधी आलेल्या पुष्पा सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात पुष्पाराज आणि भंवर सिंह शेखावत यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : 

21 जूनला मराठीतील हे 5 सिनेमे एकाच दिवशी होणार प्रदर्शित

13 वर्षानंतर रणबीरचा हा सिनेमा पुनः प्रदर्शित, वाचा कमाई

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!