Entertainment

21 जूनला मराठीतील हे 5 सिनेमे एकाच दिवशी होणार प्रदर्शित

Image credits: Instagram

गाभ

'गाभ' सिनेमा प्रेमकथेवर आधारित आहे. या सिनेमातील खास गोष्ट अशी की, कपलची लव्हस्टोरी चक्क रेडा पूर्ण करणार आहे. सिनेमात कैलाश वाघमारे आणि सायली बांधकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Image credits: Instagram

आम्ही जरांगे

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेचा प्रवास 'आम्ही जरांगे' सिनेमातून दाखवला जाणार आहे. सिनेमात मकरंद देशपांडे, प्रसाद ओक, सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.

Image credits: Instagram

विठ्ठला तूच

तूच माझा प्राण सखा...तूच माझा पाठीराखा.."विठ्ठला तूच" सिनेमा येत्या 21 जूनला प्रदर्शित होणार आहे. सिनेमामध्ये सुप्रीत निकम, मोहन जोशी आणि उषा बीबा झळकणार आहे.

Image credits: Instagram

अ व्हॅलेंटाइन्स डे

‘अ व्हेलेंटाइन्स डे’ सिनेमात अश्विनी कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रोहित राव नरसिंगे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Image credits: Instagram

झाड

दिलीप डोईफोडे आणि प्रकाश धोत्रे यांचा आगामी सिनेमा ‘झाड’ येत्या 21 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Image credits: Instagram