कियारा अडवाणीचे खरं नाव बदलण्यामागील खास कारण, ऐकून व्हाल हैराण
Entertainment Jul 31 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
31 वर्षांची झाली कियारा अडवाणी
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक कियारा अडवाणी 31 वर्षांची झाली आहे. कियाराने करियरच्या सुरुवातीला काही फ्लॉप सिनेमे दिले. पण नंतर सातत्याने हिट सिनेमे कियाराने दिलेत.
Image credits: instagram
Marathi
कियारा अडवाणीचे खरं नाव काय?
कियारा अडवाणीच्या खऱ्या नावाबद्दल बोलायचे झाल्यास तिचे नाव आलिया अडवाणी आहे. पण सिनेमांमध्ये अभिनेत्रीने आपले नाव बदलून कियारा ठेवले आहे.
Image credits: instagram
Marathi
सलमान खानच्या सल्ल्याने बदलले नाव
कियाराने सांगितले होते की, सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. खरंतर, इंडस्ट्रीमध्ये आधीच आलिया भट्ट असल्याने तू नाव बदल असे सलमान कियाराला म्हणाला होता.
Image credits: instagram
Marathi
असे ठेवले कियारा नाव
‘अंजाना अंजानी’ सिनेमात प्रियांका चोपडाने कियारा नावाची भूमिका साकारली होती. येथूनच कियारा नाव घेण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
वर्ष 2014 मध्ये कियाराचे पदार्पण
कियारा अडवाणीने वर्ष 2014 मध्ये आलेला ‘फुगली’ सिनेमातून पदार्पण केले होते. यानंतर ‘एमएस धोनी’ सिनेमा आला. पण कियाराचे काही सिनेमे सातत्याने फ्लॉप ठरले.
Image credits: instagram
Marathi
कबीर सिंह सिनेमातून मिळाली ओखळ
वर्ष 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘कबीर सिंह’ सिनेमातून कियाराला प्रसिद्धी मिळाली. यानंतर अभिनेत्रीला अनेक सिनेमांसाठी विचारण्यात आले.
Image credits: instagram
Marathi
कियारा अडवाणीचे यश
कबीर सिंह सिनेमानंतर कियाराने ‘झोली मे गुड न्यूज’, ‘शेरशाह’, ‘भूल भुलैय्या-2’, ‘सत्यप्रेम की कथा’ सारख्या सिनेमात काम केले. अभिनेत्रीचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
Image credits: instagram
Marathi
कियाराचे आगामी सिनेमे
कियारा अडवाणीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास ती साउथ अभिनेता राम चरणसोबत गेम चेंजर मध्ये झळकणार आहे. याशिवाय वॉर-2, डॉन-3, टॉक्सिक, मिस्टर लेले सिनेमातही दिसणार आहे.