शोएब मलिकची पत्नी सना जावेदच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दिल्या अशा प्रतिक्रिया

Published : Jan 29, 2024, 12:16 PM ISTUpdated : Jan 29, 2024, 12:24 PM IST
Sana-Javed-trolled-over-social-media-post

सार

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी विवाह केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंखाली नेटकऱ्यांकडून तिला चांगलेच सुनावण्यात येत आहे.

Sana Javed Instagram Post : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्जासोबत (Sania Mirza) घटस्फोट घेतल्यानंतर लगेच शोएबने केलेल्या विवाहामुळे त्याला नेटकऱ्यांनी खूप सुनावले. अशातच शोएबची नवी पत्नी आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने तिच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

सना जावेदने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून तिच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सनाच्या फोटोखाली लिहिण्यात आल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सनाने न्यूड शेडमधील लेहंगा परिधान केला आहे. या लेहंग्यावर हिरव्या रंगातील ओढणी परिधान केली आहे.

सनाच्या दुसऱ्या फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन असलेला लेहंगा परिधान केला आहे. सनाच्या या लुकला पसंत करण्याऐवजी नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. खासकरुन भारतीय नेटकऱ्यांनी सनाच्या फोटोंखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. 

एका युजरने म्हटले की, एक महिलाच महिलेचे घर मोडते. दुसऱ्याने लिहिले की, अनफॉलो सना. याशिवाय अन्य युजर्सनेही सनाच्या फोटोखाली संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शोएब आणि सना एकमेकांना तीन वर्ष करत होते डेट
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सना जावेद आणि शोएब मलिक गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.दरम्यान, वर्ष 2020 मध्ये सना जावेदचा विवाह उमर जैस्वाल नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. पण अवघ्या तीन महिन्यातच सनाचा उमरसोबत घटस्फोट झाला.

दुसऱ्या बाजूला शोएब मलिक आणि सानिया मिर्जाने वर्ष 2010 मध्ये हैदराबाद येथे मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर सानिया मिर्जा सध्या आपल्या मुलासह दुबईत राहत आहे.

आणखी वाचा : 

शोएब मलिकसाठी सानिया मिर्झाने SRKकडे मागितली होती ही मदत

शोएब मलिक पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ

अभिनेत्री सना जावेदच नव्हे या कलाकारांनीही क्रिकेटर्ससोबत केलयं लग्न

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!