नाताशा स्टेनकोविकने पुन्हा हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाची दिली हिंट? व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे नताशा स्टेनकोविक सध्या चर्चेत आहे. अशातच नताशाने एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Natasa Stankovic Video : अभिनेत्री-मॉडेल असलेली नताशा स्टेनकोविक सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नताशा आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यामध्ये फूट पडल्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून रंगल्या आहेत. अद्याप कपलने घटस्फोटाच्या बातम्यांवर मौन धरले आहे. जेव्हापासून नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत तेव्हापासून कपलने यावर काहीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच नताशाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नताशा सांगतेय, मी एका कठीण परिस्थितीतून जात आहे. दुसऱ्या बाजूला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकसंदर्भातील एकही पोस्ट नताशाने केली नसल्याने तिला नेटकऱ्यांकडून चांगलेच सुनावले जात आहे.

नताशा स्टेनकोविकने शेअर केला व्हिडीओ
नताशाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये नताशा म्हणतेय, "मी असे काहीतरी वाचण्यासाठी उत्सुक आहे जे मला आज ऐकण्याची फार गरज आहे. यामुळेच माझ्यासोबत कारमधये बायबल आणले होती. कारण मला तुम्हाला ते वाचून दाखवायचे होते. यामध्ये लिहिलेय की, देव तुमच्या पुढे चालत असतो आणि तुमच्यासोबत असतो. तो तुम्हाला कधीच सोडून जात नाही ना त्याग करतो. घाबरु नको किंवा निराश होऊ नको. ज्यावेळी आपण एखाद्या परिस्थितीचा सामना करत असतो तेव्हा निराश, दु:खी अथवा हरवल्यासारखे होते, पण देव तुमच्यासोबत असतो. तुम्ही सध्या कोणत्या स्थितीतून जात आहात यामुळे देव कधीच हैराण होत नाही, कारण त्याच्याकडे आधीपासूनच यावर मार्ग असतो."

नताशा सोशल मीडियात ट्रोल
भारताच्या संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर नताशाने काही फोटो शेअर केले होते. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत हार्दिकसाठी काही पोस्ट का केले नाही असा प्रश्न विचारु लागले. हार्दिकने भारताच्या संघाला जिंकवण्यासाठी मेहनत केलीय असेही काहींनी म्हटले.

दरम्यान, नताशा आणि हार्दिक पांड्याने वर्ष 2020 मध्ये लग्न केले होते. यानंतर कपलने पुन्हा वर्ष 2023 मध्ये धुमधडाक्यात पुन्हा लग्न केले. पण कपलच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान नताशाने इंस्टाग्रामवरुन आपले सासरचे आडनावही हटवले आहे.

आणखी वाचा : 

अनंत अंबानीच्या ममेरू सेरेमनीला बॉयफ्रेंडसोबत पोहोचली जान्हवी कपूर, या कलाकारांनीही लावली उपस्थिती

'कियारा अडवाणीला सिद्धार्थपासून धोका...',अभिनेत्याला वाचवण्याच्या नादात चाहत्याला घातला 50 लाखांचा गंडा

Share this article