नागा चैत्यनचा शोभिता धूलिपालासोबत साखरपुडा, वडिलांनीही नात्याला दिला होकार

Published : Aug 08, 2024, 10:17 AM ISTUpdated : Aug 08, 2024, 10:18 AM IST
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement

सार

Naga Chaitanya Engagement : साउथ सिनेमातील अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा 8 ऑगस्टला साखरपुडा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. साखरपुडा नागा चैतन्यच्या घरीच पार पडणार असल्याचेही बोलले जात आहे.

Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला (Sobhita Dhulipala) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच कपल 8 ऑगस्टला साखरपुडा करणार असल्याचे बोलले जात आहे. नागा चैतन्यच्या घरीच शोभिता धूलिपालासोबत साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. एवढेच नव्हे सोहळ्यानंतर सुपरस्टार नागार्जुन आपल्या मुलासह होणाऱ्या सुनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. परिवारातील एका विश्वासू सूत्रांनी माहिती देत म्हटले की, या दोघांच्या साखरपुड्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

शोभिता धूलिपालाचे रिलेशनशिपबद्दलचे मत
 नुकत्याच एका मुलाखतीत शोभिता धूलिपालाने प्रेमासंबंधित तिला काय वाटते याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी शोभिताने रिलेशनशिपच्या स्थितीवर काहीही भाष्य केले नाही. पण असे म्हटले की, मी नेहमीच प्रेमात असते. ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याची गरज आहे. खरंतर नागा चैतन्य आणि शोभिताने आपले नाते गुप्त ठेवले आहे.

नागा चैतन्य आणि सामंथा रुथचा घटस्फोट
नागा चैतन्यनने काही वर्षांपूर्वी सामंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला होता. यानंतर शोभिता धूलिपालासोबतच्या नात्यामुळे नागा चैतन्य सातत्याने चर्चेत होता. दोघांनी अद्याप सार्वजनिक पद्धतीने नात्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. पण दोघांना अनेकवेळा एकमेकांसोबत स्पॉट करण्यात आले आहे. यानंतरच नाता चैतन्य आणि सामंथाच्या अफेअरच्या चर्चेने जोर धरला आहे.

नागा चैतन्य आणि शोभिताला जून महिन्यात युरोपात फिरताना पाहिले गेले. यावेळचा दोघांचा एक फोटही व्हायरल झाला होता. त्यामध्ये नागा शोभितासोबत वाइन पिताना दिसला होता. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागल्या. दरम्यान, कपल एकमेकांना वर्ष 2021 पासून डेट करत आहेत.

नागा चैतन्य आणि सामंथाचे लग्न
नागा चैतन्य आणि सामंथाने एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर वर्ष 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. कपलच्या लग्नाचीही जोरदार चर्चा झाली होती. पण लग्नाच्या तीन वर्षानंतर वर्ष 2021 मध्ये नागा चैतन्य आणि सामंथा एकमेकांपासून विभक्त झाले. घटस्फोटानंतर सामंथा नैराश्यात गेली होती. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सामंथाला दीर्घकाळ लागला होता. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत.

आणखी वाचा : 

440Cr चा मालक असणाऱ्या Jr NTR ची कमाई ऐकून बसेल धक्का

बॉलिवूडचा अभिनेता Bangladesh च्या केवळ 6 सिनेमांमुळे बनला स्टार

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!