BB Marathi Elimination : पुरुषोत्तदादा पाटलांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

Bigg Boss Marathi 5 Elimination : किर्तनकार आणि तरुणांचे गुरु असणाऱ्या पुरुषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. खंरतर, पहिल्याच आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत पुरुषोत्तमदादा पाटील यांना सदस्यांनी नॉमिनेट केले होते. 

Bigg Boss Marathi 5 Elimination : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सीझनची सुरुवात 28 जुलैपासून झाली असून याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनची तोफ डागण्यात आली असता त्यामध्ये सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. अशातच भाऊच्या धक्क्यावर घरातील एक सदस्य बाहेर पडला आहे. यावेळी पुरुषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.

बिग बॉसच्या घरातील पहिले नॉमिनेशन
4 ऑगस्टला पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. यामुळे घरातील काही सदस्य भावूक झाले. पुरुषोत्तम दादा पाटील घरातून गेल्याने घन:श्याम दरवडे अधिक भावूक झाला. घरातून बाहेर जाताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी 'राम कृष्ण हरि' म्हणत सदस्यांना रामराम केला.

घराबाहेर आल्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांची प्रतिक्रिया
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांना रितेश देशमुखने त्यांचा घरातील अनुभव शेअर करण्यास सांगितला. यावेळी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी म्हटले की, घरात राहून खूप काही शिकलो. अभिजित सावंत शो चा विजेता ठरला पाहिजे असेही पुरुषोत्तमदादा पाटील यांनी म्हटले. याशिवाय बिग बॉसच्या घरात सुरज पवार दमदार खेळाडू नसल्याचेही रितेश देशमुखला सांगितले.

आता उरलेत 15 सदस्य
बिग बॉसच्या घरात पहिले नॉमिनेशन झाल्यानंतर आता 15 सदस्य उरले आहेत. नॉमिनेशनच्या आधी 3 ऑगस्टला झालेल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने निक्की तंबोळीची शाळा घेतली होती. यावेळी निक्कीने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह महाराष्ट्राचा केलेल्या अपमानामुळे तिला सर्वांसमोर माफी मागायला लावली होती. एवढेच नव्हे रितेश निक्कीवर संतप्त होत म्हणाला होता की, "ज्याला बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही"

कोण आहेत पुरुषोत्तमदादा पाटील? 
पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी येथील प्रसिद्ध किर्तनकार आहेत. याशिवाय किर्तनावेळी नाचतात म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही केली जाते.

आणखी वाचा : 

BB Marathi : निक्की तंबोळीला मिळाली महाराष्ट्राच्या अपमानाची शिक्षा (VIDEO)

Bigg Boss OTT 3 ची विजेती ठरली सना मकबूल, ट्रॉफीसह मिळाले एवढे रुपये

Share this article