बांग्लादेश सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जगभरात चर्चेत आहे. अशातच बॉलिवूडमधील अभिनेते चंकी पांडे जे बांग्लादेशातील काही सिनेमात काम केल्यानंतर तेथील स्टार बनले.
असे म्हटले जाते की, बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याने चंकी पांडे यांनी बांग्लादेशातील सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. यामुळेच चंकी पांडे सुपरस्टार झाले.
चंकी पांडे यांनी बांग्लादेशातील 'स्वामी केनो अशमी', 'मेयेराओ मानुष', 'प्रेम कोरेची बेश कोरेची', 'फूल और पत्थर' अशा काही सिनेमांममध्ये काम केले आहे.
चंकी पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये एक वेळ अशी आली होती ज्यावेळी मला काम मिळणे बंद झाले होते. यामुळे बांग्लादेशातील सिनेमात काम करण्याचे ठरविले होते.
चंकी पांडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वर्ष 1987 पासून आग सिनेमातून केली होती. हा मल्टीस्टार सिनेमा हिट ठरला होता. या सिनेमात चंकी पांडेंसोबत नीलम मुख्य भूमिकेत झळकली होती.
चंकी पांडे यांनी हिटपेक्षा अधिक फ्लॉप सिनेमे दिले आहेत. त्यांनी ‘मिट्टी और सोना’, ‘घर का चिराग’, ‘जहरीले’, ‘नाकाबंदी’, ‘लुटेरे’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले आहे.
चंकी पांडे यांनी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी आपले नाव बदलले होते. त्यांचे खरे नाव सुयश पांडे आहे. वडील हार्ट सर्जन आणि आई फिजिशियन होती.
चंकी पांडे यांनी बॉलिवूडसह साउथ सिनेमांमध्येही काम केले आहे. लवकरच हाउसफुल 5 सिनेमात चंकी पांडे झळकणार असून तो वर्ष 2025 ला रिलीज होणार आहे.