मुंबईतील फोर्ट परिसरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत बिस बॉस-17 सीझनचा विजेता मुनव्वर फारूकीला ताब्यात घेतले. मुनव्वरसह अन्य 13 जणांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
Mumbai : मुंबई पोलिसांनी मंगळवारी (26 मार्च) रात्री एका हुक्का पार्लरवर छापेमारी केली. यावेळी स्टॅण्डअप कॉमेडियन आणि बिग बॉस फेम मुनव्वर फारूकीला (Munawar Faruqui) ताब्यात घेतले होते. धाडीसंबंधित एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, “आमच्या टीमला हुक्काच्या नावावर तंबाखूचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतरच हुक्का पार्लवर छापेमारी केली. हुक्का पार्लरमध्ये आढळलेल्या वस्तूंच्या तपासानंतर मुनाव्वरसह अन्य 13 जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.”
मुंबई पोलिसांनी दिली घटनेची माहिती
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर टाकण्यात आलेल्या धाडीत बिस बॉस-17 सीझनचा विजेता मुनव्वर फारूकीसह अन्य 13 जणांना ताब्यात घेतले. यानंतर सर्वांची चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका केली गेली. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनव्वरने शेअर केला विमानतळावरील फोटो
पोलिसांच्या मते, फोर्ट परिसराताली अवैध रुपात हुक्का पार्लर सुरू होते. त्यावर धाड टाकत 4400 रुपयांची रोख रक्कम, 13,500 रुपये किंमतीचे नऊ हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत. सिगरेट आणि तंबाखू उत्पाद अधिनियमच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मुनव्वरला ताब्यात घेतल्याच्या बातमीनंतर त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरमध्ये मुनव्वरने विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शनमध्ये "थकलेलो आहे तरीही प्रवास करतोय" असे लिहिले आहे.
आधीही वादात सापडलाय मुनव्वर
32 वर्षीय स्टॅण्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने याआधी वादग्रस्त विधान केले होते. वर्ष 2021 मध्ये एका स्टॅण्ड अप शो वेळी हिंदू-देवी देवतांवरील एक विधान केल्याने धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी मुनव्वरला एक महिना तुरुंगात राहावे लागले होते. या घटनेनंतर मुनव्वरने कॉमेडी करण्याचे सोडत असल्याची घोषणा केली होती.
आणखी वाचा :
कमल हसन यांच्या 3 बिग बजेट तामिळ चित्रपटांचे जाणून घ्या अपडेट...
कंगना राणौतला मंडी येथून निवडणूक लढायची नव्हती, समोर आले हे कारण