शाहरुख खान सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार होता, या कारणास्तव झाली एक्झिट

Published : Mar 25, 2024, 04:09 PM IST
Shah Rukh Khan Movie Darmiyan

सार

शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार होता. पण शाहरुखची सिनेमातून का एक्झिट झाली याबद्दल जाणून घेऊया अधिक...

Bollywood : शाहरुख खान आपल्या भूमिकेसह आपल्या अदांनी चाहत्यांची मन जिंकतो. शाहरुखची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर वेगळाच ठसा उमटवते. पण तुम्हाला माहितेय का, एकदा शाहरुख खानला एका सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका करण्याची ऑफर आली होती. या भूमिकेसाठी शाहरुख तयारही होता. पण नंतर सिनेमाच्या दिग्दर्शिका नाराज झाल्याने त्याची एक्झिट झाली.

‘दमन : अ विक्टिम ऑफ मॅरिटयल वॉयलंस’ सारखे सिनेमे तयार करणाऱ्या कल्पना लाजमींच्या सिनेमात शाहरुख काम करणार होता. सध्या कल्पना लाजमी आपल्यात नाहीत. पण खरंतर ही गोष्ट वर्ष 1993-95 दरम्यानची आहे. यावेळी शाहरुखला कल्पना लाजमी यांनी दरमियान : इन बिट्वीन सिनेमात मुख्य भूमिकेसाठी विचारले होते. यासाठी शाहरुखने होकारही दिला होता.

प्रत्येक मुलाखतीत शाहरुखने केला होता सिनेमाचा उल्लेख
शाहरुख खान सिनेमासाठी ऐवढा उत्साहित होता की, प्रत्येक मुलाखतीत तो ‘दरमियान’ सिनेमाचा उल्लेख करायचा. तरीही शाहरुखला त्या सिनेमात काम करता आले नाही. खरंतर कल्पना यांनी सिनेमाचा प्लॉट समजावून सांगण्यासाठी खूप वाट पाहिली. पण त्यावेळी कल्पना यांना कळले की, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे. अशातच कल्पना यांनी शाहरुखला सिनेमातून काढण्याचा निर्णय घेतला.

शाहरुखची सेक्रेटरी अनप्रोफेशनल होती- कल्पना
सिनेमातून शाहरुखला काढण्याच्या निर्णयानंतर कल्पना यांनी एक खुले पत्रही लिहिले. या पत्रामध्ये कल्पना यांनी शाहरुखच्या सेक्रेटरीला अनप्रोफेशनल असल्याचेही म्हटले होते. खरंतर, शाहरुखच्या सेक्रेटरीने सिनेमासंदर्भात खूप काळ झाला तरीही त्याबद्दल शाहरुखची भेट करून दिली नव्हती.

वर्ष 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता सिनेमा
दरमियान’ सिनेमा वर्ष 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात किरण खेर, आरिफ जकारिया, तब्बू, शाहबाज खान आणि सयाजी शिंदे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात शाहरुखची जागा आरिफ जकारिया यांना देण्यात आली होती.

आणखी वाचा : 

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकची चर्चा, जिंकली चाहत्यांची मन

होळी सणाला कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचारावर अभिनेत्री श्रद्धा कपूर संतप्त, दोषींच्या विरोधात कार्यवाही करण्याची केली मागणी

शाहरुख खान आणि उर्फी जावेदची झाली भेट? सेल्फी फोटो शेअर केल्याने चाहते हैराण

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?