'Mr And Mrs Mahi' सिनेमा प्रदर्शित, OTT प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहाल?

Mr And Mrs Mahi OTT Release Date & Time : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री असणारा 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही' सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच ओटीटीवर कधी पाहायला मिळणार याचेही अपडेट समोर आले आहे.

Mr And Mrs Mahi OTT Release Date & Time: राजकुमार राव स्टारर नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा श्रीकांतने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. अशातच राजकुमारचा 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही' सिनेमा शुक्रवारी (31 मे) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रोमान्स, भावनात्मक नाते आणि क्रिकेटच्या खेळावर आधारित असणारा सिनेमाची कथा प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशातच 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येणार याचेही अपडेट आताच समोर आले आहे.

ओटीटीवर कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?
मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असल्याची चर्चा आहे. अशातच ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याचेही अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे ओटीटी राइट्स स्ट्रिमिंग नेटफ्लिक्सने घेतले आहेत. सिनेमागृहांमध्ये दोन महिने सिनेमा राहिल्याच्या दोन महिन्यानंतर जुलैच्या अखेरपर्यंत ओटीटीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सिनेमाची कथा
सिनेमामध्ये एका कपलची कथा दाखवली आहे. दोघांनाही क्रिकेटचे फार वेड असते. सिनेमात जान्हवी कपूर एका डॉक्टरच्या भूमिकेत असून तिला खेळ पाहणे आणि खेळण्याची फार आवड असते. राजकुमार राव क्रिकेटरची भूमिका साकारणार असून त्याला आयुष्यात यशस्वी खेळाडू व्हायचे असते. पण आपले नाव आणि ओखळ बनवण्यासाठी संघर्ष करतो त्याच दरम्यान, पत्नीला क्रिकेटर होण्याचे ट्रेनिंग देतो. यावेळीही दोघांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. आव्हाने कोणती आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.

आणखी वाचा : 

मलायका अरोरा-अर्जुन कपूरचे ब्रेकअप, अभिनेत्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत म्हटले....

'पंचायत-3' सीरिजमध्ये दडलंय 'मिर्झापुर' च्या पुढील सीझनची मोठी अपडेट, अली फजल म्हणतो…

Share this article