मलायका अरोरा-अर्जुन कपूरचे ब्रेकअप, अभिनेत्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत म्हटले....

Published : May 31, 2024, 03:37 PM ISTUpdated : May 31, 2024, 04:00 PM IST
Malaika Arora and Arjun Kapoor Breakup

सार

अभिनेत्री मलायका अरोरा-अर्जुन कूपरचा ब्रेकअप झाल्याच्या बातमीने जोर धरला आहे. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Arjun Kapoor- Malaika Arora Brakup : बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघे एकमेकांना दीर्घकाळ डेट करत होते. सोशल मीडियावर सध्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने जोर धरला आहे.अशातच मलायका अरोराने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुन कपूर आणि मलायचा ब्रेकअप
पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार एका सूत्रांनी माहिती दिली आङे की, मलायका आणि अर्जुन कपूरचे नाते मोडले आहे. या दोघांमध्ये अत्यंत खास नाते होते. दोघांच्या मनात एकमेकांसाठी स्पेशल जागा होती. अशातच दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर दोघांनी मौन बाळगले आहे. याशिवाय अर्जून आणि मलायकाला कोणालाही आपल्या नात्यावर भाष्य करण्याची परवानगी देणार नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

दोघांच्या सहमतीने मोडले नाते
एका सूत्रांनी म्हटले की, मलायका आणि अर्जुनमध्ये अत्यंत स्पेशल रिलेशनशिप होते. दोघांना एकमेकांची नेहमीच काळजी घेताना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. अशातच दोघांनी एकमेकांना सहमतीने नात्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप अधिकृतपणे या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मलायकाची इंस्टाग्रामवरील क्रिप्टिक पोस्ट
मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपदरम्यान अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रेम आणि पाठिंबा याबद्दल लिहिले आहे.

याआधीही ब्रेकअपच्या बातमीने खळबळ
यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यातच मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती. पण दोघांनी नाते मोडण्याएवजी ते कसे सावरले जाईल यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या बाजूला अरबाजने पुन्हा लग्न केल्यानेही मलायका चर्चेत आली होती.

आणखी वाचा : 

'पंचायत-3' सीरिजमध्ये दडलंय 'मिर्झापुर' च्या पुढील सीझनची मोठे अपडेट, अली फजल म्हणतो...

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!