Ashok Saraf : ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वर्ष 2023चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
Ashok Saraf : ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वर्ष 2023चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Purskar) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of Maharashtra Eknath Shinde) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदनही केले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास वर्ष 1995 पासून सुरुवात
आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे (Maharashtra State) नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास वर्ष 1995 पासून सुरुवात झाली.
मराठी सिनेसृष्टीला दिले एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे
अशोक सराफ यांनी व्यावसायिक नाटकापासून आपल्या कारर्कीदीस सुरुवात केली. यानंतर त्यांनी पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन अशा चित्रपटांतून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक
“अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंतचे विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना घडवले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले”, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा फडकवला - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
“ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वर्ष 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला, मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोकमामांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण जाहीर होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांचे विश्व त्यांनी गाजवले. सर्व प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा फडकवला. त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा”, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव - अजित पवार, उपमुख्यमंत्री
“महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं मनःपूर्वक अभिनंदन! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हसवलं. मराठीसह हिंदी कलाक्षेत्र समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वावर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे”
अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन यांचाही केला गौरव
आणखी वाचा
2024 मधील सर्वाधिक महागडा सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित