लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहेत या ज्वेलरी डिझाइन
पर्ल ज्वेलरी सध्या ट्रेण्डमध्ये असून यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन येतात. स्टोन अॅण्ड पर्ल ज्वेलरी तुम्ही कोणत्याही आउटफिटवर घालू शकता. यामध्ये चोकर आणि राणी हार सुंदर दिसतो.
टेम्पल ज्वेलरीवर भारतीय देव-देवतांची कलाकुसर करण्यात आलेली असते. साउथमध्ये टेम्पल ज्वेलरी लग्नसोहळ्यावेळी आवर्जुन घातली जाते.
भारतीय परंपरेचा थाट दाखवणारी ट्रेडिशनल ज्वेलरी तुम्ही लग्नसोहळ्यासाठी घालू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन मार्केटमध्ये मिळतील.
ऑक्सिडाइज ज्वेलरीमुळे एथनिक लुक येतो. सध्या ऑक्सिडाइज ज्वेलरी ट्रेण्डमध्ये असून तुम्ही कोणत्याही आउटफिटवर घालू शकता.
एमरल्ड ज्वेलरीचा सध्या ट्रेण्ड आहे. या ज्वेलरीमुळे तुम्हाला रॉयल लुक येतो. लग्नसोहळ्यासाठी एमरल्ड ज्वेलरी परफेक्ट पर्याय आहे.
बहुतांश महिलांना डायमंड ज्वेलरी घालणे पसंत असते. अशी ज्वेलरी तुम्ही सूट किंवा लॉन्ग गाउनवर घालू शकता.
गोल्ड ज्वेलरी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेण्डिंग डिझाइन आणि आकारात मार्केटमध्ये पाहायला मिळतील. गोल्ड ज्वेलरी कोणत्याही फंक्शनसाठी परफेक्ट आहे.