
२०१४ मध्ये झीटीव्हीवर सुरू झालेली मालिका ‘कुमकुम भाग्य’ आता तब्बल ११ वर्ष चालू राहिल्यानंतर बंद होणार आहे. शाबीर अहलूवाला आणि सृति झा यांच्या प्रमुख भूमिकांनी या मालिकेला सुरुवात झाली होती. या मालिकेने चार पिढ्यांचे कुटुंब दाखवण्यात आलं होत, TRP मध्ये अनेक वर्ष ही मालिका टॉप चार्ट्समध्ये राहिली, परंतु आता तिचा टीआरपी कमी होत चालला आहे.
मालिकेत सतत होत कथा बदलत असल्यामुळे आणि नवीन कलाकारांच्या एंट्रीनंतरही TRP कमी झाला आहे. परिणामी, निर्माता आणि झीटीव्हीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः ३००० हून अधिक भागांची मालिका चार पिढ्यांच्या कुटुंबासोबत सुरु होती. नवीन कलाकारांना मालिकेमध्ये संधी देण्यात आली होती.
झीटीव्हीने ‘कुमकुम भाग्य’ आलेल्या जागी एक नवीन पारिवारिक मालिका ‘गंगा माँ की बेटीया’ ही मालिका सुरू करण्याची तयारी केली आहे. या मालिकेकडे प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी ही घोषणाही ऐकली आणि अनेकांनी भावनात्मक ट्वीट्स टाकले. "कृपया शो बंद करू नका", चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया ही मालिका बंद कारण्यामुळं दुःख झालं आहे.
‘कुमकुम भाग्य’ हा केवळ एक टीव्ही शो नव्हे तर एक दशकभर प्रेक्षकांशी जोडलेली मालिका आहे. आता तो प्रवास आठवणींच्या भागांमध्ये बंद होणार आहे बहुतेक चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, शोच्या शेवटच्या एपिसोडनं किमान सुंदर आणि समर्पक शेवट मिळावं. त्यामुळं आता शेवटी काय होत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.