मुकेश खन्ना यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी ‘पहेली गीत 2’ केले लॉन्च

Published : Aug 07, 2025, 12:39 PM IST
mukesh khanna

सार

या गीताच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मान दिला आहे आणि विशेषत: लहान मुलं व युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश ठेवला आहे.

मुंबई - देशाचे पहिले सुपरहिरो आणि टीव्हीवरील लोकप्रिय पात्र ‘शक्तिमान’ म्हणून ओळखले जाणारे मुकेश खन्ना यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या ‘क्रांतिकारी पहेली’ या देशभक्तिपर गीतमालिकेतील दुसरे गीत ‘पहेली गीत 2’ मुंबईतील स्टार हाऊस येथे लॉन्च केले. 

या गीतात पहेली (कोडीं)च्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचे जीवनकार्य सांगण्यात आले आहे. मुकेश खन्ना मुलांशी संवाद साधतात आणि गीतात त्यांच्यासमोर प्रश्न विचारले जातात, "हा क्रांतिकारी कोण?" त्यावर मुले योग्य उत्तरं देतात. गाण्यात चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, मंगल पांडे, अशफाक उल्ला खान यांचा समावेश आहे. तर या मालिकेच्या पहिल्या भागात झांसीची राणी, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, तुर्रम खान यांची माहिती दिली गेली होती.

भीष्म इंटरनॅशनलच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गीताच्या प्रकाशन प्रसंगी गीतकार पंकज त्रिपाठी, संगीतकार सूर्या राजकमल आणि कोरिओग्राफर पप्पू खन्ना हेही उपस्थित होते.

गाण्याच्या शेवटी, मुकेश खन्ना यांनी सर्व लहानग्यांना आणि युवकांना क्रांतिकारकांची नावे लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "देशात ७,००० हून अधिक क्रांतिकारी होते ज्यांना शहीदाचा दर्जा मिळायला हवा."

मुकेश खन्ना यांनी ‘जय हिंद’ अभियानाच्या माध्यमातून शहीदांचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारकडे गेली अनेक वर्षे मागणी चालवली आहे. या गीताच्या माध्यमातून आजची पिढी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल आणि भारताच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेईल, असे ते म्हणाले.

हे गीत म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर शिक्षण, प्रेरणा आणि देशभक्तीचे एकत्रित उदाहरण आहे. त्यांनी जाहीर केले की, याच्या पुढील भाग लवकरच येणार आहेत आणि प्रत्येक गीतामध्ये नव्या क्रांतिकारकांची ओळख करून दिली जाईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bigg Boss Marathi | अनुश्री माने-राकेश बापट वाद; राकेश घर सोडणार का? | Anushree Vs Rakesh
Bigg Boss Marathi Elimination | दिव्या शिंदे सेफ? पहिली एलिमिनेशन; 9 सदस्य नॉमिनेट