Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर कियारा अडवाणी करणार धमाकेदार एण्ट्री, भारताकडून मिळालीय ही मोठी जबाबदारी

Published : May 15, 2024, 07:56 AM ISTUpdated : May 15, 2024, 08:01 AM IST
Kiara Advani

सार

Cannes 2024 : 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चाहत्यांकडून प्रतिक्षा केली जात आहे. यंदाच्या वर्षी बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा अडवाणी रेड कार्टेपटवर आपला जलवा दाखवणार आहे. याशिवाय कियाराला भारताकडून एक मोठी जबाबदारीही मिळाल्याचे बोलले जात आहे.

2024 Cannes Film Festival : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या रेड कार्पेटवर बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा अडवाणी आपला जलवा दाखवण्यास सज्ज आहे. अभिनेत्री 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री 'वुमेन इन सिनेमा' (Women in cinema) गालाचा हिस्सा बनणार आहे. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन आणि आदिती राव हैदरी देखील प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणार आहे.

कियारा अडवाणीचा कान्समधील डेब्यू
अभिनेत्री कियारा अडवाणी फ्रेंच रिवेरामध्ये आयोजित होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 77व्या ‘रेड सी फिल्म फाउंडेशन वुमेन इन सिनेमा गाला डिनर’ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अभिनेत्री करणार भारताचे प्रतिनिधित्व
व्हॅनिटी फेअरद्वारे (Vanity Fair) आयोजित केला जाणारा सन्मानसोहळा जगभरातील सहा महिलांना त्यांच्या कामगिरीसंदर्भात दिला जातो. कियाराने वर्ष 2014 मध्ये 'फगली' सिनेमातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना कियाराला पाहिले जाते. कियाराची 'कबीर सिंह' (Kabir Singh) सिनेमातील प्रीतीची भूमिका सर्वांच्या पसंतीस पडली होती.

कियाराच्या कामाबद्दल थोडक्यात
कियाराने ‘शेरशाह’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ सारख्या सिनेमातून आपल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती पॉलिटिकल थ्रिलर 'गेम चेंजर' (Game Changer) सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले असून राम चरणही सिनेमात झळकणार आहे. अभिनेत्रीकडे 'डॉन-3' आणि 'वॉर-2' सिनेमा देखील आहे.

आणखी वाचा : 

Rakhi Sawant ची बिघडली प्रकृती, अभिनेत्री हृदयाच्या गंभीर आजारने ग्रस्त? जाणून घ्या प्रकरण

ना पठाण आणि ना पुष्पा...रणबीरचा 'रामायण' सिनेमा ठरणार भारतीय सिनेसृष्टीतल सर्वाधिक महागडा सिनेमा, बजेट आले समोर

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?