KBC 16 च्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यास अमिताभ बच्चन तयार, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची तारीख

Published : Apr 17, 2024, 09:59 AM ISTUpdated : Apr 17, 2024, 10:51 AM IST
Amitabh Bachchan KBC 16 Registration

सार

KBC Season 16 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपति’ चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा एक प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. खास गोष्ट अशी की, अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा केबीसीच्या हॉट सीटवर बसणार आहेत.

KBC Season 16 : बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रुपेरी पडद्यासह टेलिव्हिजनवरील जाहिरात किंवा शोमध्ये ही दिसून येतात. खरंतर, अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोडपति’ (Kaun Banega Crorepati) शो मधून पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. कौन बनेगा करोडपतिचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो चे अनेक वर्ष सूत्रसंचालन बिग बी यांनी केले आहे.  अशातच कौन बनेगा करोडपति सीझन 16 ची निर्मात्यांनी नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय रजिस्ट्रेशनची तारीखही सांगितली आहे.

करोडपति होण्याचे स्वप्न होणार पूर्ण
कौन बनेगा करोडपितीचे प्रोडक्शन हाउस सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर आधीच्या सीझनचा अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन शो च्या अखेरच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना गुडबाय करताना दिसून येत आहेत. यावेळी बिग बी भावूक झाल्याचे दिसून येत आहेत. पोस्टसह कॅप्शनमध्ये सोनी टीव्हीने म्हटले की, ऐसा मिला प्यार की लौट रहा है फिर एक बार, कौन बनेगा करोड़पति।

कधी सुरू होणार रजिस्ट्रेशन
कौन बनेगा करोडपितीच्या व्हिडीओसह रजिस्ट्रेशनची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 26 एप्रिल पासून शो साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहेत. याशिवाय शो साठी रात्री 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

बिग बी आणि केबीसीचे जुने नाते
अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपति यांचे फार जुने नाते आहे. वर्ष 2000 पासून बिग बी केबीसीपासून जोडले गेले आहेत. अमिताभ बच्चन गेल्या 22 वर्षांपासून केबीसीचे सूत्रसंचालन करत आहेत. कौन बनेगा करोडपतिच्या केवळ तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन शाहरूख खानने केले होते.

आणखी वाचा : 

Insta वरून कमाई करतात हे स्टार्स, एका पोस्टसाठी घेतात कोट्यावधी रुपये

या Celebs ला मिळालीय जीवे मारण्याची धमकी, दुसरे नाव ऐकून धक्का बसेल

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप