27 जूनलाच Kalki 2898 AD सिनेमा प्रदर्शित केला? निर्मात्यांनी सांगितले खास कारण

Why Kalki 2898 AD Release :  प्रभास आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षीत सिनेमा कल्कि 2898 एडी गुरुवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. अशातच सिनेमा शुक्रवारएवजी गुरुवारी का प्रदर्शित करण्यात आला यावरुन प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. 

Why Kalki 2898 AD Release On 27 June :  प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात प्रभास, दीपिकाची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून गर्दी केली जात आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय की, कल्कि 2898 एडी सिनेमा शुक्रवारएवजी गुरुवारी का प्रदर्शित करण्यात आला. यामागील खास कारण निर्मात्यांनी सांगितले आङे.

खरंतर, सिनेमा गुरुवारी प्रदर्शित करण्यामागील कारण म्हणजे अंक शास्र आणि ज्योतिष शास्र आहे. फार कमी जणांना माहितेय की, सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या तारखेचा महाभारताशीही संबंध आहे. 600 कोटी रुपयांचे बजेट असणारा कल्कि 2898 एडी सिनेमा महाभारत आणि अन्य भारतीय धर्मग्रंथांवर आधारित आहे. जो, 29 व्या शतकामधील भगवान विष्णुंचा 10 वा अवतार कल्किला दाखवले आहे.

वारंवार बदललीये कल्कि 2898 एडी सिनेमाची तारीख
दिग्दर्शक नाग अश्विन यांनी कल्कि 2898 एडी सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होता. पण लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता 27 जूनला सिनेमा प्रदर्शित केल्याने काहींनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत. यामागील कारण अंक शास्र असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांनुसार, तारीख 2898 सिनेमाच्या सेटिंगसाठी खास आहे. खरंतर, 2898 हे असे वर्ष आहे (जे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार) ज्यामध्ये सिनेमाचा सेटसह तारीख आर्यभट्ट यांची गणना आणि भारतीय ग्रंथांवर आधारित आहे. याशिवाय 2898 ची एकूण बेरीज केली असता 27 अंक येतो. यामुळेच सिनेमाची प्रदर्शित होण्याची तारीख 27 जून ठेवण्यात आली.

जून 2024 चा महाभारताशी खास संबंध
निर्मात्यांनी 27 जूनला प्रदर्शित झालेल्या सिनेमावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ज्योतिषांनी यामागील कारण हिंदू कॅलेंडर असल्याचे सांगितले आहे. कॅलेंडरनुसार जूनच्या अखेरच्या आठवड्यात आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे. यंदा आषाढ महिना 23 जून पासून सुरु झाला असून 21 जुलैला संपणार आङे. खास गोष्ट अशी की, यंदाच्या वर्षात जून महिन्यात कृष्ण पक्ष 15 एवजी 13 दिवस आहे. ज्योतिषांनी दावा केलाय की, असे अखेरच्या वेळेस 5 हजार वर्षांपूर्वी झाले होते. भारतातच्या काळात कुरुक्षेत्रचे युद्ध होण्याआधीचा काळ तसा होता. कल्कि 2898 एडी सिनेमा आषाढ महिन्यातील या कृष्ण पक्षाच्या सहाव्या तारखेला प्रदर्शित होत आहे.

आणखी वाचा : 

बहिणीच्या लग्नात होतो...शत्रुघ्न सिन्हांच्या लेकाने प्रतिक्रिया देत बोलणाऱ्यांची तोंड केली बंद, म्हणाला...

Salaar सिमेमाचा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणार Kalki 2898 AD?

Share this article