Justin Bieber आणि Hailey च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, शेअर केली खास Post

Published : Aug 24, 2024, 09:40 AM ISTUpdated : Aug 24, 2024, 10:00 AM IST
Justin Bieber Welcome Baby Boy

सार

आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जीस्टनने त्याला मुलगा झाल्याची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे कपलवर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

Justin and Hailey Bieber Welcome Baby Boy : हॉलिवूड सिंगर जस्टिन बीबर आणि पत्नी, मॉडेल हेली बीबर यांच्या आयुष्यातील नवा अध्याय आता सुरु झाला आहे. जस्टिन आणि हेलीच्या लग्नाच्या सहा वर्षानंतर आयुष्यात एका लहान चिमुकल्याचे आगमन झाले आहे. 24 ऑगस्टला जस्टिनने सोशल मीडियावर चिमुकल्या बाळाचे घरी आगमन झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जस्टिनकडून हेलीच्या प्रेग्नेंसीची घोषणा
10 मे रोजी जस्टिन बीबरने एक पोस्ट शेअर करत हेलीच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. काही फोटो आणि व्हिडओमध्ये हेलीने पांढऱ्या रंगातील गाउन परिधान करत बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचे दिसून आले होते. यावेळचे फोटो खुद्द जस्टिनने क्लिक केले होते. यानंतर चाहत्यांनी हेली आणि जस्टिनला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. यानंतर हेली आणि जस्टिनकडून वेळोवेळी चाहत्यांकडून दोघांचे काही फोटो-व्हिडीओ शेअर केले जात होते.

जस्टिनच्या घरी चिमुकल्याचे आगमन
जस्टिन बीबर आणि हेली आई-बाबा झाले आहेत. शनिवारी जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. याशिवाय बाळाचे नाव काय ठेवले आहे हे देखील जस्टिनने जाहीर केले आहे. फोटोमध्ये बाळाच्या पायाला हेलीने हात लावल्याचे दिसून येत आहे. बेबीचे नाव जॅक ब्लूज बीबर असे ठेवण्यात आले आहे. जस्टिनने फोटोसह कॅप्शनमध्ये "वेलकम होम जॅक ब्लूज बीबर" असे लिहिले आहे.

कपलवर शुभेच्छांचा वर्षाव
जस्टिन बीबर आणि हेली बीबर आई-बाबा झाल्यानंतर सेलिब्रेटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. कायली जेनर, म्युझिक डायरेक्टर अल्फ्रेडो फ्लोरेससह काही कलाकारांनी पोस्टखाली बाळासह जस्टिन-हेलीला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांकडून देखील जस्टिन आणि हेलीला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जस्टिन आणि हेलीचे रिलेशनशिप
वर्ष 2006 मध्ये सेलेना गोमेझला डेट करत असतानाच जस्टिन बीबरची हेलीसोबत भेट झाली. यानंतर सेलेना गोमेझसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हेलीसोबत जस्टिनचे रिलेशनशिप सुरू झाले. या दोघांचेही ब्रेकअप झाले पण पुन्हा वर्ष 2016 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. रिलेशनशिपच्या दोन वर्षानंतर वर्ष 2018 मध्ये जस्टिन आणि हेलीने न्यूयॉर्कमध्ये लग्न केले. याच्या एका वर्षानंतर खास मित्रपरिवार आणि घरातील मंडळींच्या उपस्थितीत जस्टिन आणि हेलीने पुन्हा लग्न केले.

आणखी वाचा :

81 व्या वर्षात अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसाल तरुण, करा 3 टिप्स फॉलो

Stree सिनेमाचे शाहरुख खानसोबत कनेक्शन? राजकुमार राव म्हणतो…

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?