Stree सिनेमाचे शाहरुख खानसोबत कनेक्शन? राजकुमार राव म्हणतो...

Published : Aug 23, 2024, 12:07 PM ISTUpdated : Aug 23, 2024, 12:09 PM IST
Stree Movie

सार

राजकुमार रावचा स्री-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राजकुमार रावने आपल्या मुलाखतीत शाहरुखचा मोठा चाहता असल्याचे वारंवार सांगितले आहे. अशातच स्री सिनेमाचे शाहरुख खानसोबतचे कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे.

Rajkummar Rao on Stree Movie : बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्री-2 सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज झाला. सध्या स्री-2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांकडूनही सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी केली जात आहे. सिनेमाने केवळ आठ दिवसातच 290.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच सिनेमासंदर्भात दररोज नवे-नवे किस्से समोर येत आहे. सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या राजकुमार रावने 'स्री' सिनेमाचे शाहरुख खानसोबत खास कनेक्शन असल्याचे सांगितले आहे.

स्री सिनेमा वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. यामध्ये एक सीन असा होता की, तुमचे हसूनहसून पोट दुखेल. युट्यूबवर राज शमनी यांनी सिनेमाबद्दल राजकुमार रावला विचारले की, सिनेमातील एक सीनचे कनेक्शन बॉलिवूडमधील किंग शाहरुख खानशी संबंधित आहे. खरंतर, ज्यांनी स्री सिनेमा पाहिला त्यांना तो सीन आठवत असेल तर त्यामध्ये राजकुमार राव म्हणजेच विकीला स्री ला प्रेमाने पाहा असे सांगितले जाते.

राजकुमार राव म्हणतो की…
राजकुमार रावने सीनचा खुलासा करत म्हटले की, सीनमध्ये स्री ला पाहण्यासाठी चेहऱ्यावर शाहरुख खानसारखे हावभाव करावे लागले होते. हा सीन प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. आजही सिनेमातील डायलॉग- ‘उसकी आंख में देखो.. प्यार से उसकी आंखों में देखो, वो प्यार की भूखी है’ वेळी राजकुमार रावने शाहरुखची सिग्नेचर पोज कॉपी केल्याचे दिसून येते. राजकुमार राव शाहरुखबद्दल असे म्हणतो की, ज्यावेळी प्रेमासंदर्भात एखादी गोष्ट येते तेव्हा सर्वप्रथम बहुतांशजणांच्या डोळ्यासमोर किंग खान येतो.

स्री सिनेमातील राजकुमार रावची भूमिका
राजकुमार रावने केवळ चेहऱ्यावरील हावभावाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिनेमात राजकुमार रावने विकी नावाची भूमिका साकारली होती. हाच विकी सिनेमे पाहून मोठा झाला होता. स्री कडे पाहण्यासाठी सीन नॅच्युरल वाटण्यासाठी शाहरुख खानची आठवण काढली जात होती.

दिग्दर्शकांकडून राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक
सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक केले होते. राजकुमार रावने म्हटले होते की, "स्क्रिप्टपेक्षा हटके करण्याची संधी कलाकारांना सिनेमाच्या सेटवर दिली जाते. चुकीचा सीन झाला तरीही त्याबद्दल चर्चा करतो."

आणखी वाचा : 

प्रोटीन शेकमध्ये पत्नीचे ब्रेस्ट मिल्क मिक्स करुन प्यायचा आयुष्मान खुराना

जेनिफर लोपेज वकिलाशिवाय घेतेय घटस्फोट, कारण काय?

PREV

Recommended Stories

Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?
Rajinikanth 75 Birthday : मराठमोळ्या स्टाईल अन् अ‍ॅक्शनची रुपेरी पडद्यावर 50 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी तयार केला #HBDSuperstarRajinikanth हॅशटॅग!