जान्हवी कपूर शिखर पहारियासोबत तिरुपती येथे लग्न करणार? अभिनेत्रीने दिले हे उत्तर

Published : May 08, 2024, 12:08 PM IST
Janhvi Kapoor

सार

Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटमध्ये आहे. खरंतर, जान्हवी कपूरचे शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर अभिनेत्रीने मौन सोडत उत्तर दिले आहे.

Bollywood : अभिनेत्री जान्हवी कपूरचे  (Janhvi Kapoor) शिखर पहारियासोबत (Shikhar Pahariya) रिलेशनशिप सुरू असल्याच्या गेल्या काळापासून चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत. या दोघांना अनेकदा एकत्रित स्पॉटही करण्यात आले. अशातच जान्हवी कपूर शिखरसोबत तिरुपतीला लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावरच अभिनेत्रीने उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
जान्हवी कपूरसंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, जान्हवी कपूर तिरुपती मंदिरात गोल्डन रंगातील कांजीवरम साडी नेसून, केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळून संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत शिखर पहाडियासोबत लग्न करू शकते. यावेळी शिखरही दाक्षिणात्य नागरिकांच्या पारंपारिक वस्रामध्ये दिसेल. अशा काही गोष्टी पोस्टमध्ये लिहिल्या होत्या. यावर जान्हवी कपूरने उत्तर दिले आहे.

 

जान्हवी कपूरने म्हटले.…
जान्हवी कपूरने शिखर सोबतच्या लग्नासंदर्भातील सर्व बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. सध्या मला लग्न करायचे नाही आणि मी तिरुपती मंदिरात सात फेरे घेण्याच्या बातम्याही खोट्या आहेत.

सारा अली खानने जान्हवीच्या लग्नाबद्दल सांगितली ही गोष्ट
अभिनेत्री सारा अली खानने आपल्या एका मुलाखतीत असा दावा केला होता की, त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जान्हवी कपूर सर्वप्रथम लग्न करू शकते. याशिवाय एखाद्या मंदिरातून आपल्या नात्याची जान्हवी सुरुवात करू शकते असेही साराने म्हटले होते.

जान्हवीच्या गळ्यातील नेकलेस
दीर्घकाळापासून जान्हवी कपूर आणि शिखर पहारियाला डेट करत आहे. दोघांना अनेकदा वेकेशन आणि डिनर डेटसाठी स्पॉट करण्यात आले होते. याशिवाय जान्हवीच्या गळ्यातील नेकलेसची देखील फार चर्चा झाली होती. या नेकलेसमध्ये शिखु असे लिहिले होते.

आणखी वाचा : 

OTT वर या 5 टॉप सीरिज झाल्यात प्रदर्शित, पाहा लिस्ट

सगळ्यात महागडे ५ टीव्ही होस्ट,दुसऱ्या क्रमांकाचं नाव ऐकून बसेल धक्का !

PREV

Recommended Stories

Bigg Boss 19 विजेता गौरव खन्नाची पहिली पोस्ट, या लोकांबाबत व्यक्त केल्या कृतज्ञ भावना
कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी