शाहरुख खान ५९ व्या वर्षी दिसतो तरुण, त्याच्या आहारात 'या' ४ पदार्थांचा असतो समावेश

Published : Sep 29, 2025, 11:24 AM IST

वयाच्या ५९ व्या वर्षीही शाहरुख खान त्याच्या खास आहारामुळे तरुण आणि ऊर्जावान दिसतो. त्याच्या आहारात मोड आलेले कडधान्य, ग्रील चिकन, ब्रोकली आणि मसूर यांचा समावेश असतो. 

PREV
16
शाहरुख खान ५९ व्या वर्षी दिसतो तरुण, त्याच्या आहारात 'या' ४ पदार्थांचा असतो समावेश

वयाच्या ५९ व्या वर्षी शाहरुख खान हा अभिनेता तरुण दिसतो. त्याच्या तरुण दिसण्याचे रहस्य त्याच्या आहारात असल्याचं आढळून आलं आहे. त्याने त्याबद्दलची माहिती दिली आहे.

26
शाहरुख खान काय खातो?

शाहरुख खान हा त्याच्या आहारात मोड आलेले कडधान्य, ग्रील चिकन, ब्रोकली आणि काही प्रमाणात मसूर खातो. हा साधा आहारच त्याच्या तरुणपणाचे रहस्य असून त्यामुळं तो कायमच उर्जावान दिसतो.

36
शाहरुखचा आहार पौष्टीकतेने भरलेला असतो

शाहरुख खानचा आहार हा पौष्टीकतेने भरलेला असतो अशी माहिती डॉक्टरांनी दिला आहे. तो कायमच निरोगी आणि तरुण दिसतो. तो खात असलेल्या अन्नामुळे आतड्यांचे आरोग्य, स्नायूंची ताकद आणि त्वचा चमकदार दिसायला लागते.

46
ग्रील चिकन हा आहारातील महत्वाचा घटक

शाहरुख खानच्या आहारातील ग्रील चिकन हा महत्वाचा घटक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तो लिन प्रोटीनचा एक महत्वाचा मार्ग असून त्यामुळं स्नायू मजबूत होऊन शरीराला प्रथिने मिळतात.

56
किती प्रथिने शरीराला मिळतात?

शाहरुख खात असलेल्या १०० ग्रॅम ग्रील चिकनमधून त्याला ३० ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यामुळे स्नायू मजबूत होऊन शरीराला प्रथिने चांगले मिळतात. चिकनचा आहारात समावेश करायला हवा.

66
इतर पदार्थांमधून काय मिळत?

शाहरुखच्या आहारात ब्रोकलीचा समावेश केल्यामुळे त्याला फायबर, अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे चांगले मिळतात. मोडाचे पदार्थ दिल्यामुळे अंकुरांमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि पाचक एंझाइम भरपूर प्रमाणात मिळतात. मसूरमधून वनस्पती प्रथिने, फायबर आणि खनिजे मिळतात.

Read more Photos on

Recommended Stories