Jolly LLB Movie Collection: जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली छप्परफ़ाड कमाई, आकडा ऐकून येईल चक्कर

Published : Sep 27, 2025, 03:54 PM IST

Jolly LLB Movie Collection: जॉली एलएलबी ३ ने रिलीजच्या आठ दिवसांत एकूण ७८ कोटींची कमाई केली आहे. तर, पवन कल्याणच्या 'दे कॉल हिम ओजी' या चित्रपटाने दोन दिवसांत १०४ कोटींचा टप्पा पार केला आहे. 

PREV
16
Jolly LLB Movie Collection: जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली छप्परफ़ाड कमाई, आकडा ऐकून येईल चक्कर

देशभरात सध्या नवरात्रीची धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. अनेकजण दांडियाच्या कार्यक्रमात व्यस्त झाले आहेत. यावेळी अनेक प्रकारचे चितपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. कोर्टरूम कॉमेडीजपासून ते गँगस्टर, क्राइम, ड्रामापर्यंत आणि थेट अॅक्शन थ्रिलरपर्यंत, चित्रपटप्रेमींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

26
बॉक्स ऑफिसवर कोणते चित्रपट दाखल झाले?

अशातच पॉवर स्टार पवन कल्याणचा "दे कॉल हिम ओजी" (They Call Him OG Movie) हा चित्रपट भारतीय थिएटरमध्ये सुरू असलेल्या चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहे. शुक्रवारी 'ओजी', 'जॉली एलएलबी 3 , (Jolly LLB 3)' 'निशांची' (Nishaanchi) आणि 'लोका: चॅप्टर 1 - चंद्रा' (Lokah Chapter 1: Chandra) ने बॉक्स ऑफिसवर (Box Office) किती कमाई केली ते जाणून घेऊया.

36
जॉली एलएलबी ३ चित्रपटाने किती कमाई केली?

जॉली एलएलबी ३ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 74 कोटी कमावले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' ने रिलीजच्या आठव्या दिवशी 4 कोटी कमावले. यासह, 'जॉली एलएलबी 3' ची आठ दिवसांत एकूण कमाई आता ₹78 कोटींवर पोहोचली आहे.

46
"दे कॉल हिम ओजी" चित्रपटाने किती कमाई केली?

पवन कल्याण आणि इमरान हाश्मी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट "दे कॉल हिम ओजी" ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली. त्याची प्री-सेल ₹21 कोटी होती. त्यानंतर, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ₹63.75 कोटींची कमाई केली. यासह, भारतातील पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ₹84.75 कोटींवर पोहोचले आहे.

56
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?

'दे कॉल हिम ओजी'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ₹19.25 कोटी कमावले. यासह, 'दे कॉल हिम ओजी'ची दोन दिवसांत एकूण कमाई आता ₹104 कोटींवर पोहोचली आहे.

66
मिराई चित्रपटाने किती कमाई केली?

मिराई चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात त्याने ₹65.1 कोटी (अंदाजे $1.94 दशलक्ष USD) कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने ₹19.4 कोटी (अंदाजे $1.5 दशलक्ष USD) कमावले.

Read more Photos on

Recommended Stories