हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे

Published : Oct 18, 2025, 11:52 AM IST

बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी ७७ व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतात. यशस्वी चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांनी राजकारणातही ठसा उमटवला असून, त्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. 

PREV
16
हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे

बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी या कायमच चर्चेत असतात. त्या ७७ वर्षांच्या असून अजूनही चिरतरूणच दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेक मुलींना आपल्याला यांच्यासारखा सौंदर्य हवं असं स्वप्न पडत असतं.

26
हेमा मालिनी यांनी राजकारणात उमटवला ठसा

हेमा मालिनी यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं.

36
हेमा मालिनी यांनी पदार्पणातच दिले हिट सिनेमे

हेमा मालिनी यांनी पदार्पणातच हिट सिनेमे दिले. तुम हसीन मैं जवान’, ‘अभिनेत्री’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमांनी तेव्हा बॉक्स ऑफिस नवे विक्रम रचले. तीन सिनेमे हीट ठरल्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’, ‘शोले, ‘नसीब’, ‘क्रांती’, ‘कर्मा’, ‘धर्मात्मा’, ‘बागबान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘त्रिशूल’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली.

46
हेमा मालिनी किती श्रीमंत आहेत?

हेमा मालिनी या किती श्रीमंत आहेत ते जाणून घेऊयात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांची एकूण मालमत्ता १२३.६ कोटींची संपत्ती आहे. खूप लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी चांगले पैसे कमवले.

56
लोकसभा निवडणूक किती वेळा जिंकली?

हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर मथुरा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी २०१९ आणि २०२४ ला जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

66
धर्मेंद्र यांच्यासोबत कधी लग्न केलं?

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर धर्मेंद्र यांचे लग्न झालं आणि त्यानं चार मुलं झाली. पण बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली आणि दोघांनी समाजाविरोधात जाऊन लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत.

Read more Photos on

Recommended Stories