गौतमी पाटील: गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने केलेल्या अपघातानंतर सुरू झालेला वाद आता मिटल्याचे दिसत आहे. गौतमीने स्वतः जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर रिक्षाचालकाच्या मुलीने तिचे आभार मानल्याने या प्रकरणाला नवे वळण आले आहे.
गौतमी पाटीलने किती लाखांची केली सेटलमेंट, अपघातग्रस्त कुटुंबीय आणि गौतमी व्हिडिओत दिसले एकत्र
गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचा अपघात झाला आणि ती परत एकदा चर्चेत आली. तिच्याकडून मरगळे नावाच्या रिक्षाचालकाला गाडी ठोकली आणि नंतर त्यांनी बराच ओरडा केला होता. त्यामध्ये आता हा वाद थांबला असल्याचं दिसून आलं आहे.
26
आधी एकमेकांवर केले होते आरोप
आधी दोनही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले होते. मरगळे कुटुंब गौतमीच्या विरोधात आक्रमक झालं होते तर दुसऱ्या बाजूला गौतमी पाटील हिने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. याचा तपास पोलीस करत होते.
36
गौतमी पाटीलने मरगळे कुटुंबाने मदत नाकारल्याचा केला होता दावा
गौतमी पाटील हिने मरगळे कुटुंबाने मदत नाकारल्याचा दावा केला होता. आता सर्व पोलिसांच्या तपासानुसार आणि कायद्यानुसार होऊद्या अशी तिने मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
गौतमी पाटीलचा मरगळे कुटुंबासोबतचा व्हिडीओ आला समोर
गौतमी पाटीलचा मरगळे कुटुंबासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. त्या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये मतभेद मिटल्याचं दिसून आलं आहे. व्हिडिओमध्ये अपर्णा मरगळे या हसऱ्या चेहऱ्याने सांगताना दिसतात की, गौतमी पाटीलने स्वतः येऊन माझ्या वडिलांची विचारपूस केली.
56
गौतमी शांतपणे बसली होती
गौतमी यावेळी शांतपणे बसली असल्याचं दिसून आलं होतं. या दृश्यामुळे ‘वाद मिटला की कहाणीला नवीन ट्विस्ट आला?’ असा प्रश्न आता नेटीझन्स विचारताना दिसत आहेत. दरम्यान अपघातातील जखमी झालेले रिक्षाचालक मरगळे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे
66
अपर्णा मरगळ यांनी गौतमीचे मानले आभार
यावेळी अपर्णा मरगळ यांनी गौतमी पाटीलचं आभार मानलं आहे. यामध्ये त्यांनी माझ्या वडिलांना १५ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज भेटला असं सांगितलं. यावेळी गौतमी ताई पाटील यांनी येऊन माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला विचारपूस केली आणि आम्ही जो अप्रोच केला त्यानंतर ते आल्या त्यासाठी त्यांचा धन्यवाद.