हुरून रिच लिस्टनुसार, अभिनेता शाहरुख खानची एकूण संपत्ती १४०० कोटी रुपये आहे. त्याच्या मालकीच्या मालमत्तांमध्ये मुंबईतील २०० कोटींचा 'मन्नत' बंगला, अलिबागमधील हेलिपॅडसह प्रॉपर्टी आणि लंडन व दुबईतील आलिशान घरांचा समावेश आहे.
शाहरुख खान हा संपूर्ण भारतातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता असण्यासोबतच तो व्यावसायिक असून त्याची स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी आहे. तसेच तो कोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक आहे.
26
हुरून रिच लिस्टमध्ये शाहरुखच आलं नाव
शाहरुख खानचा हुरून रिच लिस्टमध्ये नाव आलं आहे. या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्ये शाहरुखच नाव सर्वात वर आलं आहे. त्याची संपत्ती तब्बल १४०० कोटींची असल्याची माहिती देण्यात आली आहे.
36
शाहरुखचा मुंबईत मन्नत बंगला
शाहरुख खानचा मुंबईमध्ये मन्नत नावाचा बंगला आहे. पांढऱ्या रंगाचा सहा मजल्यांचा हा बंगला प्रेक्षक जाऊन भेट देत असतात. या बंगल्याची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल २०० कोटी आहे.
अलिबागला शाहरुख खानचं स्वतःच हेलिपॅड असलेली प्रॉपर्टी आहे. वाढदिवस किंवा नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी शाहरुख खान येथे जवळच्या मित्रांसोबत जात असतो. यामध्ये स्विमिंग पूल असून ही प्रॉपर्टी त्यानं १४.६७ कोटींना विकत घेतली आहे.
56
मूळ दिल्लीचा असणाऱ्या शाहरुख येथे आहे घर
शाहरुख खान हा मूळ दिल्लीचा राहणारा असून या ठिकाणी त्यानं घर बांधलं आहे. दिल्लीतील पंचशील पार्कजवळ त्याच घर असून या ठिकाणी त्याची वडिलोपार्जित जमीन आहे.
66
लंडन आणि दुबईत घेऊन ठेवलीत घरं
लंडन आणि दुबई याठिकाणी शाहरुख खान याने घरं घेऊन ठेवली आहेत. त्याने लंडनमध्ये खरेदी केलेल्या अपार्टमेंटची किंमत तब्बल १७५ कोटी रुपये आहे. दुबईत त्याचा बंगला असून १०० कोटींच्या या घराचं नाव त्यानं जन्नत ठेवलं आहे.